Amol Balwadkar : पुण्यात अमोल बालवडकरांनी शेवटच्या फेरीत विजय खेचून आणला; भाजपच्या डोळ्यात खुपणारा धक्कादायक निकाल जाहीर

Amol Balwadkar : पुण्यात अमोल बालवडकरांनी शेवटच्या फेरीत विजय खेचून आणला; भाजपच्या डोळ्यात खुपणारा धक्कादायक निकाल जाहीर
NCP candidate Amol Balwadkar celebrates victory after defeating BJP in Baner-Pashan-Sus ward.
NCP candidate Amol Balwadkar celebrates victory after defeating BJP in Baner-Pashan-Sus ward.Sarkarnama
Published on
Updated on

Amol Balwadkar : पुणे महापालिकेमध्ये भाजपने 100 हुन अधिक जागा जिंकत एकहाती विजय मिळवला आहे. या निकालानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु असतानाच रात्री उशिरा भाजपसाठी धक्कादायक निकाल जाहीर झाला आहे. प्रभाग क्रमांक 9 बाणेर-पाषाण-सुस इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी शेवटच्या फेरीत विजय खेचून आणला. त्यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत 650 मतांच्या मताधिक्याने धक्कादायकरित्या पराभव केला. त्याच प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार बाबुराव चांदेरे यांनीही विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत बघायला मिळाली. 8 व्या फेरीअखेर लहू बालवडकर यांची अमोल बालवडकर यांच्यावर 1135 मतांची आघाडी होती. पण 9 व्या फेरीमध्ये अमोल यांनी ही आघाडी तोडत विजयाकडे वाटचाल केली. त्यानंतरही भाजपकडून फेरमतमोजणीची मागणी घेण्यात आली. पण त्यातून काहीही हाती लागले नाही. अखेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अमोल बालवकडर यांनी लहू बालवडकर यांच्यावर 650 मतांनी विजय नोंदविला.

पुणे महापालिका निवडणुकीत अमोल बालवडकर यांचे भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शेवटच्या एका तासात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लगेचच घड्याळ चिन्हावरून उमेदवारी घेतली. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीमध्ये पंगा घेतल्यानेच अमोल यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा होती. तर पक्षाकडून त्यांचा गुंडासोबत फोटो व्हायरल झाल्याने उमेदवारी कापण्यात आल्याचे सांगितले गेले.

NCP candidate Amol Balwadkar celebrates victory after defeating BJP in Baner-Pashan-Sus ward.
Pune Election Result: सातव्यांदा नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले; माजी उपमहापौरांना महापालिका सभागृहाचा रस्ता बंद; भाजपने धूळ चारली

पुण्यात राष्ट्रवादीची निराशजनक कामगिरी :

एका बाजूला अमोल बालवडकर यांचा विजय झाला असला तरीही पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पुण्यात रात्री उशीरापर्यंत 165 पैकी 135 जागांचे अधिकृत निकाल जाहीर करण्यात आले होते. यात भाजपने तब्बल 96 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस 30 च्या आसपास जागा घेताना दिसत आहे. काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला आहे. अद्यापही सर्व जागांचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com