`शिरूरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार गुलाल उधळणार`

`शिरूरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार गुलाल उधळणार`

तळेगाव ढमढेरे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून ऍड. अशोक पवार यांनी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा विकासातून चेहरामोहर बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल,'' असे मत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्या "वारसा लोकहिताचा, ध्यास नावीन्याचा' या कार्यअहवालाच्या प्रकाशनप्रसंगी माजी आमदार गावडे बोलत होते.

गावडे म्हणाले, ""ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखंडित महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला. अशोक पवार यांनी तालुक्‍यातील विविध मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न केले; म्हणूनच तालुक्‍यातील विविध सहकारी संस्था ताब्यात ठेवण्यात यश आले. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल.''

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले, ""माजी आमदार अशोक पवार यांचा कार्यअहवाल कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारा आहे. शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील व सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर एकनिष्ठ राहून सर्वसामान्यांची कामे करणारा कार्यकर्ता म्हणून अशोक पवार यांच्याकडे जनता पाहात असून आगामी विधानसभा राष्ट्रवादी जिंकणार आहे.''

माजी आमदार अशोक पवार, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, माजी सभापती आरती भुजबळ यांचे या वेळी भाषण झाले.

अशोक पवार यांनाच उमेदवारी मिळणार
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून "राष्ट्रवादी'चा उमेदवार अद्याप निश्‍चित झाला नसला तरी ऍड. अशोक पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये होती. पवार यांनाच उमेदवारी मिळाल्याचे गृहीत धरून कार्यकर्ते कामाला लागल्याचेही चित्र सर्वांच्या चेहऱ्यांवर दिसत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com