बारामतीवाले पार्सलचं पॅकिंग छान करतात; राष्ट्रवादीचा टोला |Pune Politics

Nirmala Sitaraman| सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यामागेही भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
Supriya Sule | Nirmala Sitaraman|
Supriya Sule | Nirmala Sitaraman|
Published on
Updated on

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत अनेक राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यामागेही भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपने (BJP) विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच पार्श्वभूमीवर 16 ते 18 ऑगस्ट हे तीन दिवस निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहे.

Supriya Sule | Nirmala Sitaraman|
Baramati Politics|भाजपचं मिशन 45 ; सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यामागे अशी आहे रणनीती

सीतारमण यांच्या या दौऱ्यावर आता युवक राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ''तीन दिवस बारामती मधे येऊन पिकनिक करण्यापेक्षा बारामती लोकसभा निवडणूकचं एकदा लढून बघा...बारामती वाले पार्सलचं पॅकिंग खूप छान करतात. काही अनुभव घेतलेले लोक भाजप मधे आहे तर काही रासप,शिंदे गटात स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.'' असे ट्विट करत सुरज चव्हाण यांनी भाजपला टोला हाणला आहे.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचा त्यांचा हा गंभीर प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

पक्षाच्या मिशन 45 चा एक भाग म्हणून, भाजपने सीतारमण यांना बारामतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची प्रमुख भूमिका सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com