Deepak Mankar Resign: पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल,मानकरांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा; अजितदादा अन् तटकरेंना म्हणाले...

NCP Pune City President Resign : दोन दिवसांपूर्वी दीपक मानकर यांच्यावर पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्काराच्या आरोपाखाली अटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व पदाधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयाची देवाणघेवाण प्रकरणांमध्ये मानकर यांनी बनावट कागदपत्रे पोलिसांना सादर केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Ajit Pawar - Deepak Mankar
Ajit Pawar - Deepak MankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी राजीनामा दिला आहे. मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपलं राजीनामाचे पत्र पाठवला असून आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली आहे.

दोन दिवसांपूर्वी दीपक मानकर Deepak Mankar यांच्यावर पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्काराच्या आरोपाखाली अटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व पदाधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयाची देवाणघेवाण प्रकरणांमध्ये मानकर यांनी बनावट कागदपत्रे पोलिसांना सादर केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात अटकेची टांगती तलवार त्यांच्यावरती असतानाच त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

मानकर यांनी पत्रात काय म्हटलंय..?

आपल्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मी सन 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव प्रामाणिक प्रयत्न केले. आपण मला विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. तेव्हापासून आजपर्यंत उपमहापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष ह्या विविध पदांची जबाबदारी देऊन मला सामाजिक व राजकीय काम करण्याची संधी दिली.

Ajit Pawar - Deepak Mankar
Maharashtra IPS Transfer: CM फडणवीसांचं धक्कातंत्र सुरुच, पुन्हा 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र शिसवेंवर मोठी जबाबदारी

जुलै 2023 मध्ये झालेल्या राजकीय बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे विभाजन झाले व आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी क्षणाचा न विचारता मी आपल्यासारख्या भक्कम नेतृत्वासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपणही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत दिनांक 6 जुलै 2023 रोजी मला राष्ट्रबादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी त्यावेळी पक्षाचे नाव व चिन्ह यांचा निर्णय होण्याअगोदर पक्षाला पाठींबा म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती त्यामध्ये पुणे शहरातून मी सुमारे 9500 प्रतिज्ञापत्र गोळा करून महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जमा केले आहेत.

Ajit Pawar - Deepak Mankar
MLA Kiran Lahamte Car Accident: मोठी बातमी: अजितदादांच्या लाडक्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची समोरासमोर धडक

शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्रात नसेल इतकी मोठी जम्बो कार्यकारिणी करत फादर बॉडी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यांसह विविध सेलवर सुमारे 1500 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पक्षाचे व आपले काम करण्याची संधी देत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराअंतर्गत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, साहित्य-कला, क्रीडा, वारकरी सांप्रदाय, क्षेत्रात 200 पेक्षा जास्त कार्यक्रम घेत तळागाळात लोकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम केलं.

तसेच माझ्या माध्यमातून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमारे १ लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद नोंदणी पुस्तिकांचे आमदार, नगरसेवक, तसेच पदाधिकारी यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील अनेक सभासद नोंदणी पुस्तिका पक्ष कार्यालय येथे जमा झालेले आहेत. आपल्या आदेशाप्रमाणे तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार आपला पक्ष व पक्षाची विचारधारा ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील सर्व घटकातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असून नागरिकांच्या समस्या आजही सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

मात्र माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

Ajit Pawar - Deepak Mankar
Atul Bhosale : पृथ्वीराजबाबांना धूळ चारणाऱ्या अतुल भोसलेंना फडणवीसांकडून ‘टॉनिक’; सातारा लोकसभेतील कामगिरीची बक्षिसी!

दर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मानकर यांनी केली आहे, यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com