Rupali Patil-Thombare : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. खासदार शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या पीडितेचे फेसबुक लाईव्ह करत पीडितेची ओळख उघड केल्या प्रकरणी रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यावर राज्य महिला आयोगाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर या रुपाली पाटलांना अडकवणार तर नाही ना? अशीही चर्चा आता रंगली आहे.
पीडितेचे नाव घेणं किंवा तिला कॅमेऱ्यासमोर आणून पीडितेची ओळख लोकांसमोर आणणं चुकीचं असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसेच रुपाली पाटील यांच्याविरोधात तक्रारी आल्या असून राज्य महिला आयोग कारवाई करणार असल्याचं चाकणकर यांनी स्वत: सांगितलं आहे.
रुपाली पाटील या काही दिवसांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादीत आल्या आहेत. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत चांगल्या सक्रिय देखील झाल्या आहेत. राष्ट्रवादीत सक्रिय होण्यासाठी त्यांना अजित पवारांचं देखील पाठबळ मिळालं अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी होती. तर आता त्यांनी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याचीही इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे रुपाली पाटील-ठोंबरे या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. मात्र असं असतानाच त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.
तसेच रुपाली चाकणकर या देखील राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आहेत तसेच रुपाली पाटील या ही राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. तरी देखील रुपाली चाकणकर या आपल्याच पक्षातील महिला नेत्याविरोधात कारवाई करणार असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चाकणकर या रुपाली पाटलांना अडकवणार तर नाहीत ना? अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे.
रुपाली चाकणकर आज माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ''एखाद्या पीडितेची ओळख मीडियासमोर आणणं चुकीचं आहे. याबाबत काही सामाजिक संघटनांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्या पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे'', असं चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, पीडित महिलेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी रुपाली पाटील-ठोंबरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.