Devendra fadnavis, Amruta fadnavis
Devendra fadnavis, Amruta fadnavissarkarnama

Devendra fadnavis : प्रभू श्रीरामांवर देवेंद्र फडणवीस यांचे गीत, अमृता फडणवीस गायिका...

Amruta fadnavis : हे गीत लवकरच रिलीज होणार असून प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे.
Published on

Pune : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांवर गीत लिहिले आहे. हे गीत लवकरच रिलीज होईल. विशेष म्हणजे या गीताची काही कडवी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायली आहेत. खुद्द अमृता फडणवीस यांनीच तसे जाहीर केले.

Devendra fadnavis, Amruta fadnavis
Maratha Reservation :'शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंनी फसवले', मराठा आरक्षणासाठी...

आज (रविवारी) 'नमो वॉकेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अमृता फडणवीस (Amruta fadnavis) उपस्थित होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी लिहिलेल्या गाण्यातील काही कडवी गायली. हे गीत लवकरच रिलीज होणार असून प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी हे गीत संगीतबद्ध केल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी 'नमो वॉकेथॉन'चा शुभारंभ झाला. वॉकेथॉनच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 5 महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. 22) होत आहे. त्यानिमित्त शहरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या शुभेच्छा देणारे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत. '

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिर नरेंद्र मोदींमुळेच...

प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत होत आहे. मात्र त्याचा आनंदोत्सव देशभर साजरा केला जातोय. प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होणार आहेत, ही सर्व देशवासीयांसाठी सुखाची बाब आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यांनी घेतलेला योग्य निर्णय यामुळे हे साध्य झालेले आहे. सर्व राम भक्तांसाठी हा आनंदाचा दिवस असणार आहे, असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com