Pimpri Chinchwad : बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात; परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड... पण ग्राऊंडवर वेगळीच स्थिती!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही आम्‍ही स्‍वबळावर लढू म्‍हणत आपला स्‍वाभिमानाचा बाणा दाखविला.
NCP leaders in Pimpri-Chinchwad express confidence to contest independently; Ajit Pawar faces organizational challenges
NCP leaders in Pimpri-Chinchwad express confidence to contest independently; Ajit Pawar faces organizational challenges Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने स्वबळाची भाषा सुरु केली आहे. त्याचीच री ओढत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आम्‍ही स्‍वबळावर लढू म्‍हणत आपला स्‍वाभिमानाचा बाणा दाखविला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती पाहता संघटना मजबूत करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकाऱ्यांपुढे आहे.

पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अत्यंत भावनिक अन् जिव्हाळ्याचा विषय आहे. अजित पवार हे 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी पिंपरी-चिंचवड शहर हे बारामती मतदारसंघाचा भाग होते. अजित पवार यांनीही त्यानंतर शहरात लक्ष घातले. शहराला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनवले.

2017 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिकेत स्वबळावर सत्तेत होता. पण 2017 च्‍या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड 36 नगरसेवकांवर येऊन ठेपली. राष्ट्रवादीची 14 वर्षांची एकहाती सत्ता भाजपने उलथवून टाकली. याचे शल्‍य अजित पवार यांना आहे. शहरातील आपले वर्चस्‍व पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्‍न सुरू आहेत.

NCP leaders in Pimpri-Chinchwad express confidence to contest independently; Ajit Pawar faces organizational challenges
NCP Pune leadership : महापालिका रणसंग्रामासाठी पुण्यात राष्ट्रवादीचा 'डबल डाव' ; नवे नेतृत्व अन् नवी रणनीती!

मात्र, अजित पवार यांच्यासमोर आव्‍हानांचा डोंगरही उभा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शहरातील 2 वगळता इतर सर्वच नगरसेवक अजित पवार यांच्‍यासोबत राहिले. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील अस्‍वस्‍थ झालेले माजी नगरसेवक शरद पवार यांच्‍या राष्ट्रवादीत सहभागी झाले. माजी स्‍थायी समितीचे सदस्‍य अजित गव्‍हाणे यांनी पुढाकार घेतला होता.

शहरातील अध्यक्षानेच पक्ष बदलल्‍याने भोसरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्‍का मानला जात होता. आता यातील अनेक जण पुन्‍हा अजित पवार यांच्‍याकडे जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप पक्षाने भूमिका घेतली नाही.याशिवाय आज घडीला शहर पातळीवर नेतृत्‍व करणारा चेहराही पक्षाकडे नाही. पक्षबांधणी देखील वेगाने होताना दिसत नाही. ही अडचण अजित पवार कसे सोडविणार हे पाहणे उत्‍सुकतेचे ठरणार आहे.

NCP leaders in Pimpri-Chinchwad express confidence to contest independently; Ajit Pawar faces organizational challenges
NCP Pune: अजितदादांचा मास्टर स्ट्रोक; पुण्याची जबाबदारी सुनील टिंगरे अन् सुभाष जगताप यांच्यावर

याशिवाय सध्या राज्यभर गाजत असलेले वैष्णवी हगवणे आत्‍महत्‍या प्रकरण हेही पिंपरी-चिंचवडमधीलच आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र हगवणे याचे नाव राष्ट्रवादीशी जोडण्यात आले आहे. अजित पवार यांनी हगवणेची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्या आणि पक्षाचा काहीही संबंध नाही’, असे वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘डॅमेज इमेज’ रोखता आली नाही. आगामी काळात हे रोखण्यासाठी पक्ष काय पर्याय पुढे आणतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com