Pune ZP President : झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला एसटीने आले अन॒ लाल दिव्याच्या गाडीतून घरी गेले!

Devram Lande News : वल्लभशेठ बेनके यांच्या पाठिंब्याने 2002 मध्ये राष्ट्रवादीचे देवराम लांडे अनपेक्षितपणे पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष बनले. ते एसटीने पुण्याला आले आणि परत लाल दिव्याच्या गाडीतून घरी गेले.
Devram Lande
Devram LandeSarkarnama
Published on
Updated on

1 पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद 2002-05 या काळात अनुसूचित जमातीसाठी राखीव असताना, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे देवराम लांडे यांची निवड माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या आग्रहामुळे झाली.

2 सुरुवातीला खेड तालुक्यातील अश्विनी मोरमारे यांचे नाव निश्चित झाले होते, परंतु बेनके यांनी शरद पवारांशी मध्यरात्रीपर्यंत चर्चा करून पक्षश्रेष्ठींना लांडे यांचे नाव मंजूर करायला भाग पाडले.

3 अनपेक्षितपणे अध्यक्षपदी पोहोचलेल्या लांडे यांनी पुढे बेनके यांच्याशी मतभेद निर्माण केले, शिवसेनेत प्रवेश केला आणि 2024 विधानसभा निवडणुकीत बेनके यांच्या मुलगा अतुल बेनके यांच्या विरोधात निवडणूक लढवली.

Pune, 21 September : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम करण्याची अनेक सदस्यांना अनपेक्षितपणे संधी मिळाली आहे. काहींच्या डोक्यावर पक्षश्रेष्ठींचा हात असल्यामुळे त्यांना सहजासहजी खुर्ची मिळाली. मात्र, आदिवासी बहुल जुन्नर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले देवराम लांडे यांना 2002 ते 2005 या कालावधीत माजी आमदार (स्व.) वल्लभशेठ बेनके यांच्यामुळे अध्यक्षपदाची लॉटरी लागली होती. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी लांडे हे जुन्नरहून एसटीने पुण्याला आले होते आणि परत जुन्नरला घरी जाताना लाल दिव्याच्या गाडीतून गेले होते.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पाडळी-तांबे या जिल्हा परिषद गटातून २००२ ते २००७ या पंचवार्षिक निवडणुकीत देवराम लांडे (Devram Lande) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे एसटी प्रवर्गासाठी राखीव होते, त्यामुळे खेड तालुक्यातील अश्विनी मोरमारे यांचे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निश्चित केले होते. राष्ट्रवादीकडून मोरमारे यांचे नाव अंतिम झाले होते.

जुन्नरमधून निवडून आलेले देवराम लांडे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तत्कालीन ज्येष्ठ आमदार वल्लभ बेनके यांनी आग्रह धरला होता. पण, अजितदादांनी खेडमधील अश्विनी मोरमारे यांचे नाव निश्चित केले होते. पण, बेनके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बेनके यांनी मध्यरात्री भेट घेतली होती.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जुन्नरला न मिळाल्यास पक्ष सोडण्याचाही इशारा आमदार वल्लभ बेनके यांनी दिला होता. मध्यरात्रीपर्यंत जोरदार घडामोडी सुरू होत्या. अखेर आमदार बेनके यांच्या आक्रमकतेपुढे अखेर पक्षश्रेष्ठींनी माघार घेत अश्विनी मोरमारे यांच्याऐवजी जुन्नर तालुक्यातील देवराम लांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षाचे नाव मध्यरात्री बदलण्यात आले.

दुसरीकडे, आपल्यासाठी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, याची साधी कुणकूणही देवराम लांडे यांना नव्हती. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी हेच देवराम लांडे हे जुन्नरहून एसटी बसने पुण्याला गेले होते. पुण्यात जिल्हा परिषदेत गेल्यानंतर लांडे यांना अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर लांडे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि त्यांची नियुक्ती झाली.

आदिवासी नेते देवराम लांडे यांना पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी तब्बल अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली. पण या आदिवासी नेत्याची अध्यक्षपदाची इनिंग वेगळ्याच कारणासाठी गाजली होती. आमदार वल्लभ बेनके यांच्या वरदहस्तामुळे अनपेक्षितपणे अध्यक्ष झालेले लांडे यांनी मात्र पुढील काळात बेनके यांना झटका दिला होता.

वल्लभ बेनके यांची साथ सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वल्लभ बेनके यांचे चिरंजीव माजी आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यामुळे लांडे यांच्या अध्यक्षपदासाठी ज्या वल्लभ बेनके यांनी प्रतिष्ठा पणाला लावली, त्या बेनकेंच्या विरोधात देवराम लांडे उभे राहिले होते.

  1. प्र: देवराम लांडे कोणत्या गटातून जिल्हा परिषदेत निवडून आले होते?
    उ: जुन्नर तालुक्यातील पाडळी-तांबे गटातून.

  2. प्र: अध्यक्षपदासाठी सुरुवातीला कोणाचे नाव निश्चित झाले होते?
    उ: खेड तालुक्यातील अश्विनी मोरमारे.

  3. प्र: लांडे यांना अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी कोणाने प्रयत्न केले?
    उ: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार (स्व.) वल्लभ बेनके.

  4. प्र: नंतर लांडे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करून कोणाच्या विरोधात निवडणूक लढवली?
    उ: त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून माजी आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात 2024 विधानसभा निवडणूक लढवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com