
Advocate Asim Sarode on Police Misconduct and Legal Errors : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कथित रेव्हे पार्टीचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आता पुण्यात विधिज्ञ असिम सरोदे यांनीही उडी घेतली आहे.
असिम सरोदे यांनी सोमवारी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे. तसेच हे प्रकरण पोलिसांना भोवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. काही लोकांना 'आरोपी' म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून शूटिंग करणे तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
NDPS कायदा आणि डॉ प्रांजल यांच्या केसबाबत एकनाथ खडसेसोबत चर्चा झाली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी दरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्याचेही सरोदे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे. इतरांच्या खाजगी आयुष्याचा अपमान करणारे हे कोणते पोलिसिंग आहे? राजकीय हेतुप्रेरित पोलिसिंग बंद करण्यासाठी पावले उचलणार असल्याचेही सरोदेंनी स्पष्ट केलंय.
एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे?, असा सवाल खडसेंनी केला आहे.
मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना? अशी शंका खडसेंनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.