NEET Paper Leak: 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल अन् प्रा. मोटेगांवकर आले अडचणीत; विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताच झाला भांडाफोड

NEET Paper Leak: नीटच्या पेपर फोडणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश सीबीआयनं केला आहे. यामध्ये लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसचे सर्वोसर्वा प्रा. शिवराज मोटेगावर यांना सीबीआयनं अटक केली आहे.
Sarkarnama News
Sarkarnama News
Published on
Updated on

NEET Paper Leak : नीटच्या पेपर फोडणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश सीबीआयनं केला आहे. यामध्ये लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसचे सर्वोसर्वा प्रा. शिवराज मोटेगावर यांना सीबीआयनं अटक केली आहे. पण या पेपर लीकचे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात त्यांचा एक क्लासच्या प्रमोशनचा व्हिडिओ कारणीभूत ठरला आहे. यामध्ये त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यामुळं त्यांचा भांडाफोड झाला अशी सध्या चर्चा आहे.

Sarkarnama News
Stalin Vs Trisha Krishnan : तामिळनाडूत मोठी घडामोड! जोसेफ विजयच्या जागेवरुन अभिनेत्री त्रिशा लढणार? विरोधात स्टॅलिन यांच्या नावाची चर्चा

व्हीडिओत काय?

प्राध्यापक शिवराज मोटेगावर यांनी NEET परीक्षा झाल्यानंतर दोन विद्यार्थ्यीनींना पेपर कसा गेला आणि आपल्या क्लासचा तुम्हाला फायदा कसा झाला? या आशयाचे काही प्रश्न विचारले. याचा शॉर्ट रिल त्यांनी बनवलं आणि त्याद्वारे क्लासेसचं प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी प्रश्न विचारता म्हटलं की,

प्रा. मोटेगावर : नीट २०२६ चा आत्ताच पेपर झाला, आरसीसी मॉक टेस्ट आणि आसरीसी टेस्ट सिरीजमधून प्रश्न आले?

विद्यार्थीनी १ : याच्या बाहेरचे प्रश्न आलेच नाहीत.

प्रा. मोटेगावर : तुम्ही आरसीसीवर खूश आहात? खरंच खूश आहात? बायोलॉजी काय म्हणतंय?

विद्यार्थीनी १ : सगळं एनसीआरटी बेस्ड मॉक टेस्टमध्ये जे विचारलं तेच आलं.

प्रा. मोटेगावर : आपल्या मॉकपेक्षा सोपं होतं की अवघड होतं.

विद्यार्थीनी १ : सोपं

प्रा. मोटेगावर : व्वा छान!

प्रा. मोटेगावर : कसा गेला तुला पेपर केमिस्ट्री, फिजिक्स बायोलॉजी?

विद्यार्थीनी २ : खूप छान गेला सर. तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते ना जास्तीत जास्त त्यातून आले होते प्रश्न.

प्रा. मोटेगावर : शेवटी आपण मॉक टेस्टला जे प्रश्न घेतो त्यांपैकीच आले होते. व्वा व्हेरी गुड.

प्रा. मोटेगावर : म्हणजे आरसीसीचे पेपर फॉलो केलं तर ते पुरेसे आहेत.

विद्यार्थीनी २ : हो पुरेसे आहेत.

प्रा. मोटेगावर : व्वा व्वा व्हेरी गुड व्हेरी गुड. अभिनंदन

Sarkarnama News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या वाढणार, कॅबिनेटच्या निर्णयाला राष्ट्रपतींची मंजुरी, 33 वरून थेट...

प्रा. मोटेगावर यांना नीट पेपरफुटी प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. पण सीबीआयच्या चौकशीदरम्यान हा व्हिडिओ तपासला गेला असावा, कारण यात विद्यार्थींनीनी मोटेगावकरांच्या क्लासेसमध्ये शिकवले जाणाऱ्या मॉक टेस्टच्या बाहेरचे प्रश्न आलेच नव्हते अशी प्रतिक्रिया दिल्यानं सीबीआयचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्या दिशेनं तपास सुरु करताच त्याचे धागेदोरे हे प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचल्याचं निष्पण्ण झालं आहे.

Sarkarnama News
Maharashtra MLA Salary : PM मोदींच्या आवाहनानंतर सगळ्यांचीच काटकसर; पण, आमदार, खासदार अन् मंत्र्यांना काय-काय सुविधा मिळतात?

दरम्यान, रविवारी त्यांची सीबीआकडून आपल्या पुण्यातील कार्यालयात दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, सीबीआयच्या टीमनं प्रा. मोटेगावकर यांच्या लातूरच्या ऑफिससह त्यांची घरी छापेमारी केली. त्यानंतर या छापेमारीत केमिस्ट्री या विषयासंबंधीचे काही पेपर्स जप्त करण्यात आले यातील प्रश्न हे अगदीच नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांशी मिळते जुळते होते. यानंतर सीबीआयच्या टीमनं त्यांच्या कार्यालयातून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर कागदपत्रंही जप्त केली आहेत. यानंतर प्रा.मोटेगावकर यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर कोर्टाकडून त्यांना ९ दिवसांची ट्रान्झिट कोठडी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com