Stalin Vs Trisha Krishnan : तामिळनाडूत मोठी घडामोड! जोसेफ विजयच्या जागेवरुन अभिनेत्री त्रिशा लढणार? विरोधात स्टॅलिन यांच्या नावाची चर्चा

तामिळनाडूतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. सत्तेतून पायउतार झालेले डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे त्रिरुचापल्ली म्हणजेच त्रीची ईस्ट या जागेवरुन पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
MK Stalin Vs Trisha Krishnan
MK Stalin Vs Trisha Krishnan
Published on
Updated on

Stalin Vs Trisha Krishnan : तामिळनाडूतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. सत्तेतून पायउतार झालेले डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे त्रिरुचापल्ली म्हणजेच त्रीची ईस्ट या जागेवरुन पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. डीएमकेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्टॅलिन यांना याबाबत आग्रह करण्यात आला आहे, इतकंच नव्हे तर तसा ठरावच पक्षानं केला आहे. त्यामुळं स्टॅलिन या जागेवरुन निवडणूक लढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पण या जागेबाबत दोन इंटरेस्टिंग गोष्टीही सध्या चर्चेत आहेत, त्या म्हणजे त्रीची ईस्ट या दुसऱ्या जागेवरुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या जोसेफ विजय यांनी निवडणूक जिंकली होती. तसंच याच जागेवर विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडून अभिनेत्री त्रिशा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे.

MK Stalin Vs Trisha Krishnan
8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन? 8 व्या वेतन आयोग अन् जुन्या पेन्शनबाबत आली 'ही' महत्त्वाची अपडेट!

त्रीची ईस्टच्या जागेवरुन त्रिशा निवडणूक लढवणार की नाही याबाबत टीव्हीकेनं अद्याप कुठलंही अधिकृत विधान केलेलं नाही. पण दुसरीकडं डीएमकेच्या कार्यकारिणीत स्टॅलिन यांनी त्रीचीतूनच पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि टीव्हीके प्रमुख अभिनेता जोसेफ विजय यानं त्रीची ईस्ट या जागेवरुनच २७,४१६ मतांनी विजय मिळवला होता. डीएमकेच्या उमेदवाराचाच त्यांनी पराभव केला होता. पण सरकार स्थापन झाल्यानंतर विजय यांनी आपली पेरम्बूरची जागा कायम ठेवली असून त्रीची ईस्ट या जागेवरचा राजीनामा दिला आहे.

MK Stalin Vs Trisha Krishnan
BMC News: मोठी बातमी: मुंबई महापालिकेतून धक्कादायक अपडेट समोर,राजकीय गेम फिरणार? 79 नगरसेवक अडचणीत,निवडणूक प्रक्रियेवरच शंका?

२००८ च्या मतदरासंघ पुनर्रचनेनंतर चिरुचापल्ली विधानासभा मतदारसंघ (त्रीची ईस्ट) अस्तित्वात आला. त्यानंतर पहिल्यांदाच या जागेवरुन पोटनिवडणूक होणार आहे. आतापर्यंत या जागेवरुन आजवर चार निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये दोन वेळेस AIDMK, एका वेळेस DMK आणि एकदा TVK (जोसेफ विजय) जिंकले आहेत. पण आात निवडणुकीनंतर विजयनं ही जागा सोडली आहे. पण इथं आता पोटनिवडणूक होणार असली तरी कुठल्याही परिस्थितीत ही जागा टीव्हीकेकडंच राखण्याचाच प्रयत्न विजयचा असणार आहे. भलेही विजयनं आता सत्ता स्थापन केली असली तरी आपलं संख्याबळ कमी व्हावं असं त्यांना वाटणार नाही. या जागेवर विजयची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

MK Stalin Vs Trisha Krishnan
CBIने अटक केलेला RCCचा शिवराज मोटेगावकर कोण? विद्यार्थ्यांच्या घरी ट्युशन ते 100 कोटींचं साम्राज्य

दरम्यान, त्यामुळं ही जागा जिंकण्यासाठी विजयकडं एक हुकमी एक्का आहे तो म्हणजे विजयची कथित प्रेयसी आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन. पण त्रिशा ही टीव्हीकेची सदस्य नाही. पण माध्यमांतील वृत्तांनुसार, टीव्हीके या पक्षातील काही नेते त्रिशाला राजकारणात पाऊल टाकण्याचा आग्रह करत आहेत, तसंच चिरुचिरापल्ली ईस्ट या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी आग्रह देखील करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com