Nirmala Nawale News: उच्च न्यायालयाचा जिल्हाधिकाऱ्यांना झटका; 'सरपंच मॅडम'ना दिलासा

Karegaon Sarpanch Politics : माजी सरपंच अनिल नवले यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्मला नवले यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यात सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करावे, अशी मागणी अनिल नवले यांनी केली होती.
Nirmala Nawale.jpg
Nirmala Nawale.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण महिला सरपंच निर्मला नवले यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या कारणास्तव नवले यांना सरपंचपदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानं पुन्हा एकदा नवले यांचा सरपंचपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी सरपंच अनिल नवले यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने सरपंच निर्मला नवले (Nirmala Nawale) यांना पात्र ठरवले आहे. हा माजी सरपंच अनिल नवले यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नवले यांनी 2021 मध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरत विजयाचा गुलाल उधळला होता. तसेच त्यांची कारेगावच्या सरपंचपदी नियुक्ती करण्यात आली होती.

माजी सरपंच अनिल नवले यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्मला नवले यांच्याविरोधात तक्रार केली होती.त्यात सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करावे, अशी मागणी अनिल नवले यांनी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र केले होते.

निर्मला नवले यांची सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांची कारेगाव ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचपदी निवड झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात नवले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. अपात्रेसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

Nirmala Nawale.jpg
Kundlik Khande News : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला जामीन मिळाला, मात्र घरी जाता येणार नाही !

न्यायालयाच्या निर्णयावर निर्मला नवले काय म्हणाल्या..?

न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर निर्मला नवले म्हणाल्या,सत्याचा विजय होतो.मला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्य लाभले. उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या केसचा ऐतिहासिक निकाल माझ्या बाजूने लागला.

कारेगावमधील माझ्या सर्व जनतेचे आशीर्वाद व माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत कायम असलेले माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य आपले देखील मी मनापासून आभार मानते.हे सर्व माझ्या पाठीशी ठामपणे होते. त्यामुळेच आज हे शक्य होऊ शकले असेही सरपंच निर्मला नवले यांनी म्हटलं आहे.

हा विजय माझ्या एकटीचा नसून गायरानात राहणाऱ्या माझ्या सर्व ग्रामस्थांचा आहे. असेच तुमचे आशीर्वाद आणि साथ यापुढे देखील माझ्यासोबत राहील अशीही अपेक्षा निर्मला नवले यांनी व्यक्त केली आहे.

Nirmala Nawale.jpg
Mahayuti News : डिमांड 50 जागांची, चाचपणी 288 मतदारसंघाची; युतीतील 'हा' पक्ष स्वबळाच्या वाटेवर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com