Nitin Gadkari News : नितीन गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, '2024 संपण्यापूर्वी हिंदुस्थानमधील रस्त्यांचं नेटवर्क अमेरिकेच्या..'

Political News : रोजगार निर्मिती झाल्यास देशातील गरिबी दूर होणार आहे. सुखी, समृद्ध हिंदुस्थान भयमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Pune News : रस्ते, वीज, पाणी व दळणवळणाची साधने याचा विकास झाला तर कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र व व्यापार क्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे इकॉनॉमीचे साइज वाढून ग्रोथ रेट वाढणार आहे. ग्रोथ रेट वाढल्यास रोजगार निर्मिती वाढणार आहे. रोजगार निर्मिती झाल्यास देशातील गरिबी दूर होणार आहे. सुखी, समृद्ध हिंदुस्थान भयमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

सकाळचे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते 'पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचे भविष्य' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. (Nitin Gadkari News)

विश्वगुरु असलेला देश निर्मितीसाठी भविष्यकाळातील टेकनॉलॉजीचा वेध घेऊन वर्तमानकाळावर अभ्यास करून भविष्याचे उद्दिष्ट गाठण्याची गरज आहे. त्यासाठी बेस्ट क्वालिटीचे इन्फ्रास्टक्चर झाले पाहिजे. 2024 संपण्यापूर्वी हिंदुस्थानमधील रस्त्याचे नेटवर्क अमेरिकेच्या बरोबरीने असणार आहे. त्यासाठी पैशाची कमतरता नाही. काम करणाऱ्याची गरज आहे.

Nitin Gadkari
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना कुटुंबातूनच मोठा धक्का; सात महिन्यातच मेहुणे खतगावकरांनी साथ सोडली

इमानदारीने काम केले तर भ्रष्टचारमुक्त व समाजाबद्दलची कटिबद्धता ठेवून काम केले तर येणाऱ्या काळात आपण निश्चितच विश्वगुरु होऊ, असा विश्वास आहे. गरिबी दूर झाली आहे तर इकॉनॉमिक प्रगती झाली आहे. त्यामुळे निश्चितपणे येत्या काळात विश्वगुरु होऊ, असा विश्वास व्यक्त करीत ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद प्रत्येक भारतीयात आहे. ते सर्वांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा दृढ विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari
Solapur Politics : कट्टर विरोध, 30 वर्षे संघर्ष अन् आता सोबती..! मोहिते पाटील जानकरांना 'आमदार' करणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com