Supriya Sule News : नितीशकुमार यांच्या भूमिकेनंतर ताईंचे सूचक वक्तव्य

Supriya Sule Reaction on Bihar CM Nitish Kumar : बिहारमधील नाट्यमय राजकीय घडामोडींवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule Pune News :

बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलटफेर झाला आहे. नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज नवव्यांदा शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलासोबत असलेली दीड वर्षाची आघाडी तोडत नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत गेले. चार वर्षांत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Nitish Kumar हे देशामध्ये तयार झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे नेते होते. नितीशकुमार यांनीच 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे घेतली होती .आता नितीशकुमार यांच्या 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या विविध पक्षांच्या भूमिका समोर येत आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी आता या नाट्यमय राजकीय घटनाक्रमावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Supriya Sule
Nitish Kumar News : नितीशकुमारांचं आधीच प्लॅनिंग, इंडिया आघाडीत...! खर्गेंचा गंभीर आरोप

'इंडिया' आघाडीमधून नितीशकुमार बाहेर पडले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडणं हा नितीशकुमार यांचा वैयक्तिक निर्णय होता. लोकशाही आहे. त्यामुळे ते असे निर्णय घेण्यास स्वायत्त आहेत. मात्र मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे एक वर्षापूर्वीचे भाषण आठवते. ज्यामध्ये ते नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झालेत, असे म्हणाले होते. राजकीय विचारधारेचा विचार न करता दिलेला शब्द सतत फिरवायचा ही भाजपची पद्धत झाली आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

बॅचलर राहील परंतु राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले होते. मात्र नंतर त्यापासून त्यांनीही फारकत घेतली. एखादा माणूस विरोधात असताना भाजपकडून त्याच्यावरती टोकाची टीका केली जाते. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा वापर करून माणसं, पक्ष फोडून भाजपची सत्ता कशी आणली जाईल? यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे भाजपला कोणत्याही प्रकारची नैतिकता राहिली नसल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीशकुमार हे 'इंडिया' आघाडीमधून बाहेर पडले असले तरी बिहारमध्ये त्याचा विशेष असा फरक पडणार नाही. तेजस्वी यादव आणि काँग्रेस त्या ठिकाणी जोरदार लढा देतील, असे सुप्रिया सुळे म्हणल्या.

'इंडिया' आघाडीतील काही पक्ष आपापल्या राज्यामध्ये स्वबळाचा नारा देत आहेत. हे पक्ष आपापल्या राज्यात स्वबळावरती लढले तरी पूर्वी स्वबाळावरती लढून नंतर ते एकत्र आले होते. त्यांनी यूपीएचे सरकार स्थापन केले होते. त्या प्रमाणे पुन्हा एकदा ते एकत्र येतील, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

Supriya Sule
Supriya Sule Speech : ‘मी अनेकदा बोलत नाही, याचा अर्थ माझे सेटिंग आहे, असे समजू नका’; सुळे असं का म्हणाल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com