Sharad Pawar Ambegaon Meeting: भुजबळ, मुंडेंनंतर आता वळसे पाटलांचा नंबर; आंबेगावात लवकरच सभा घेण्याचा पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द

Dilip Walse Patil News : संपूर्ण पुणे जिल्ह्यात पदांबाबत आंबेगाव तालुक्याला झुकतं माप देऊनसुद्धा... अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pargaon (Pune) : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचा येवला झाला.... कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड झाले....आता नंबर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा. होय, आंबेगावमध्ये सभा घेण्याचा शब्दच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात पदांबाबत आंबेगाव तालुक्याला झुकतं माप देऊनसुद्धा... अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली, असे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी सांगितले. (Sharad Pawar will soon hold a meeting in Ambegaon)

देवदत्त निकम यांनी नुकतीच कार्यकर्त्यांसह बारामतीत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती निकम यांनी आज (ता. १७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन दिली.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, दामूआण्णा घोडे, गुलाब धुमाळ, धोंडीभाऊ भोर, दौलत भोर, संजय बढेकर, विशाल वाबळे, हनुमंत गव्हाणे, ईश्वर गायकर, गोपाळ गवारी या प्रमुख कार्यकर्त्यांसह देवदत्त निकम यांनी सोमवारी (ता. १४ ऑगस्ट) गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

Sharad Pawar
Sharad Pawar Sabha : आता वेळ आलीय.... चुकीच्या लोकांना आवरायची; शरद पवारांचा निशाणा कोणावर?

शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना शरद पवारांनी दीड तास दिला. त्यांनी दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला अर्धा तास मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्यासोबत कोणी राहू अथवा न राहू. मी माझी भूमिका कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. आंबेगावमध्ये मी लवकरच येणार आहे. त्यावेळी स्पष्टपणे बोलेन. त्यानंतर वातावरण बदलेले, तुम्ही काही काळजी करू नका, असे पवारांनी सांगितल्याचे देवदत्त निकम यांनी नमूद केले.

Sharad Pawar
Sandeep Kshirsagar Mimicry: संदीप क्षीरसागरांनी पुन्हा केली धनंजय मुंडेंची नक्कल; म्हणाले, ‘कुणाचाही नाद करा; पण....’

आजही माझ्या घरात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचाच फोटो आहे. कारण, मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत बंडखोर अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतरसुद्धा मी वळसे पाटील यांचे नेतृत्व मानून त्यांच्यासोबत होतो. पण, आज वळसे पाटील हे शरद पवार यांच्या विचारांपासून दूर गेले आहेत. मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत आहे, असे निकम यांनी सांगितले.

Sharad Pawar
Sandeep Kshirsagar Speech : शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांच्या पायाशी राहीन; संदीप क्षीरसागरांचे भावनिक भाषण

निकम म्हणाले की, माझ्यासोबत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आहेत. मी त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण अनेक जण स्वतः अथवा त्यांची मुलं तालुक्यातील विविध संस्थांमध्ये कामाला आहेत. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. काहींची बदलीही केली जात आहे. येत्या काही दिवसांत शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची आंबेगाव तालुका कार्यकारिणी आपण जाहीर करणार आहोत. या वेळी मारुती पाचारणे, महेश भोजणे, प्रशांत वाळुंज, विशाल वाबळे, संदीप निकम, भगवान रोडे, नीलेश रोडे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com