Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama

OBC Leader Laxman Hake : आज 'ते' पुरोगामी ओळख जपताना दिसत नाहीत, ओबीसी नेते हाकेंनी कोणावर केली टीका ?

OBC Reservation : राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद पेटला असताना शरद पवार यांनी तोंडातून ब्र शब्द देखील काढलेला नाही.
Published on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची आज मुंबई येथे भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात तर्क वितर्क लढवण्यात येत आहे.तशाच याबाबत राजकीय व्यक्तींच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून ओबीसी (OBC) आरक्षणासंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुरोगामी नेता, जाणता राजा म्हटलं जात.मात्र शरद पवार आज ती पुरोगामी ओळख जपताना दिसत नाहीत,असा माझा स्पष्ट आरोप आहे.

राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद पेटला असताना शरद पवार यांनी तोंडातून ब्र शब्द देखील काढलेला नाही. कधीकाळी शरद पवार हे 18 पगड जातींना एकत्रित घेऊन या महाराष्ट्राच्या नेतृत्व करायचे. मात्र आता शरद पवार मराठा-ओबीसी का बोलत नाहीत? असा प्रश्न महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला पडला आहे.

Laxman Hake
Video Chhagan Bhujbal: आमदारकी-मंत्रीपद गेले तरी मला पर्वा नाही; पवारांच्या भेटीनंतर भुजबळ म्हणाले,....

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन आपला पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कुठे आहे.याबाबत चर्चा केली असेल तसेच महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यासाठी भुजबळ त्यांना भेटले असावेत.असं हाके म्हणाले.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी काढलेल्या शांतता रॅली बाबत बोलताना हाके म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद विकोपाला गेला आहे.

ज्या मराठवाड्याने खान की बाण हा वाद अनेक दशके पाहिला त्या मुस्लीम समाजाच्या मनात विश्वास निर्माण करणार आहात का ? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना केला.

Laxman Hake
IAS Pooja Khedkar Update : खेडकर कुटुंबियांची पंकजा मुंडेंच्या ट्रस्टला लाखोंची देणगी; देवीला चांदीचा मुकूट !

मराठा समाजाने विविध भागात आतापर्यंत 56 मोर्चे काढले. यामध्ये त्यांची प्रमुख मागणी ही अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी होती. या कायद्याचा गैरवापर करत मराठा समजातील बांधवांवर दाखल केलेले गुन्हे यामुळे मराठा समाजाचे हे मोर्चे काढले होते.

त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी या बाबत आपली भूमिका जाहीर करावी. त्यानंतर मग दलितांचा कळवळा येवू द्यावा, असंही हाके म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com