
Pune News ; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक करून भारताने 'आमच्या वाट्याला गेल्यात तर घुसून मारू,' हे पुन्हा एकदा पाकिस्तानला दाखवून दिले आहे. पाकिस्तानवर झालेल्या या एअर स्ट्राइकनंतर पहलगाम हल्ल्यांमध्ये बाधित असलेल्या कुटुंबांनी आनंद व्यक्त केला आहे. पुण्यातील जगदाळे कुटुंबाने देखील ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी माध्यमांशी बातचीत केली. प्रगती जगदाळे म्हणाल्या, पहलगाम येथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी सौ प्रगती संतोष जगदाळे होती.
कुंकवाचे महत्व ते प्रत्येक सुहासिनीला किती असतं हे कोणीही समजू शकत नाही. मात्र ते प्रत्येक स्त्रीला जाणवत असतं,पहलगामच्या हल्ल्यामध्ये माझं कुंकू पुसलं गेलं. त्या दहशतवाद्यांनी माझं कुंकू पुसलं, रक्ताच्या थारोळ्यात संतोष जगदाळे पडले होते ते शहीद झाले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. यातून मोदींमध्ये ती जाणीव दिसून येते की आपल्या लेकींचं सिंदूर या दहशतवाद्यांनी मिटवलय. ही जाणीव त्यांनी आता दहशतवाद्यांना करून दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर मोदीजींच्या लेकींच्या नवऱ्यांना आपण मारलं आहे. त्यानंतर काय होतं ही जाणीव सातत्याने त्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जाणवत राहील. पाकिस्तानमधील ज्या नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला केला आहे तो अत्यंत योग्य आहे. आता हा हल्ला थांबू नये प्रत्येक दहशतवादाला शोधून त्याची पाळमूळ संपवायला हवीत.
ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या लोकांना मारलं त्याच पद्धतीने त्यांना देखील गोळ्या घालायला हव्यात. माझ्या मिस्टरांसाठी आणि ज्यांनी ज्यांनी या दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.