Shivsena News: ऑपरेशन टायगर, ठाकरेंच्या माजी आमदारांची सामंतांशी भेट; पक्षप्रवेशाबाबत मोठं विधान

Thackeray former MLA news : पुण्यातील तीन माजी आमदारांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले असल्याच्या चर्चा आहेत.
Eknath Shinde | Uday Samant
Eknath Shinde | Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. या ऑपरेशन टायगरला केंद्रामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हिरवा कंदील दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

या ऑपरेशन टायगरचा एक भाग हा पुण्यात देखील रंगणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटातील दोन माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील तीन माजी आमदारांचा शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश होणार असून याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले असल्याच्या चर्चा आहेत.

Eknath Shinde | Uday Samant
Maharashtra Politics : भाजप-शिवसेना युतीची चर्चाच की पडद्यामागं मोठं काही घडतंय? बदललेले राजकारण कोणत्या दिशेने जाणार?

कोथरूडचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत संभाव्य प्रवेशाबद्दल चर्चा सुरू आहे. पुण्यातील तीन माजी आमदार, ज्यात काँग्रेसचे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रवींद्र धंगेकर, हडपसरचे महादेव बाबर आणि कोथरूडचे चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश आहे, हे सर्व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. पुण्यात होणाऱ्या या “ऑपरेशन टायगर”ची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

Eknath Shinde | Uday Samant
ShivSena UBT : पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेसेनेच्या हालचाली, उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर

याबाबत चंद्रकांत मोकाटे यांना विचारले असता मोकाटे म्हणाले, 'काही वैयक्तिक कारणांसाठी मागील काही दिवसांमध्ये मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली आहे. मात्र भेट झाली म्हणजे मी पक्ष प्रवेश करणार असे नाही. अद्याप तरी मी पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. माजी आमदार असल्याने लोकांच्या कामासाठी अशा भेटी होत असतात. परंतु पक्षप्रवेशाचा कोणताही निर्णय अद्याप मी घेतलेला नाही.

Eknath Shinde | Uday Samant
Shivsena News : आमचा पक्ष प्रवेश कधी होणार? 'त्या'माजी नगरसेवकांकडून नेत्यांकडे विचारणा!

मी ठाकरे गटामध्ये नाराज आहे. त्याबाबतची नाराजी मी नेत्यांपुढे देखील व्यक्त केली आहे. कोथरूड विधानसभा निवडणूक लढवत असताना आमच्याच पक्षातील एका इच्छुकाने निवडणुकीत माझं काम केलं नाही. त्या व्यक्तीला बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसवण्यात आले. त्यामुळे मी माझी नाराजी माझ्या वरिष्ठांकडे सांगितली असून त्यांनी चूक झालं असल्याचे देखील कबूल केले आहे, असे मोकाटे म्हणाले.

Eknath Shinde | Uday Samant
Ekanath Shinde : शिंदे सत्तेत आले खरे, पण पक्षाबाबत गाफील राहीले तर....?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com