Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर’चा पुण्यात धमाका? वसंत मोरेंना शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर! ​मोठं ऑफिस अन् मोठं पद..., स्वतःच 'त्या' फोनविषयी सांगतिलं!

Vasant More Eknath Shinde : सचिन अहिर हे एकनाथ शिंदेसोबत गेल्यानंतर वसंत मोरे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांना थेट शिंदेंच्या पक्षातील एका नेत्याकडून फोन करून शिंदेंसोबत येण्याची ऑफर दिली होती.
Vasant More attacked cm Eknath Shinde
Vasant More attacked cm Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक नेते ऑपरेशन टायगर अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेतील सहा खासदार शिंदे सेनेमध्ये दाखल झाले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार आणि पुण्याचे संपर्कप्रमुख असलेले सचिन अहिर देखील शिंदे सेनेत मध्ये दाखल झाल्या असून त्यांना विधान परिषदेचे उपसभापती पद देखील देण्यात आल आहे.

सचिन अहिर हे शिंदे यांच्या सेनेमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचं सुतवच केलं होतं. त्यामुळे आणखी कोणते कोणते नेते शिंदे सेनेमध्ये दाखल होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील महानगर प्रमुख असलेल्या वसंत मोरे यांना देखील शिंदे कडून ऑफर देण्यात आली असल्याचं समोर आला आहे.

वसंत मोरे यांना ठाकरे सेनेने 30 एप्रिल रोजी पुण्याचं महानगर प्रमुख पद दिले आहे. त्यापूर्वी 29 एप्रिला पुण्यातील शिंदे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने वसंत मोरे यांना संपर्क करून शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत. आमच्या पक्षात आल्यास आनंद होईल. याबाबत शिंदे साहेबांशी आपलं बोलणं झालं असून महानगरपालिकेमध्ये आपल्याला मोठे ऑफिस देखील मिळणार आहे, असं सांगितले.

Vasant More attacked cm Eknath Shinde
Sanjay Raut Controversy : संजय राऊतांवर सामूहिक नाराजीचा स्फोट? ठाकरेंच्या पक्षाला पदाधिकाऱ्यांचा रामराम; 12 जुलैला शिंदे शिवसेनेत मोठा प्रवेश?

यावर वसंत मोरे यांनी तुमच्याकडे मोठमोठे नेते असताना माझ्यासारख्याची त्या ठिकाणी काय गरज अशी विचारणा केली. त्यावर तुमच्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे आणि तुम्ही प्रभावी नेते आहात त्यामुळे आपल्याकडे पक्ष वाढीसाठी तुमचा फायदा होईल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी यावी असं पक्ष नेतृत्वाचं असल्याचं त्यावेळी समोरील व्यक्तीने सांगितलं.

संजय राऊतांना कल्पना दिली अन्...

या सगळ्या घडामोडींबाबत वसंत मोरे यांनी त्याच दिवशी रात्री तत्कालीन संपर्कप्रमुख सचिन आहेर आणि खासदार संजय राऊत यांना कल्पना दिली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वसंत मोरे यांना ठाकरे सेनेने महानगर प्रमुख पद दिल्याचं पाहायला मिळालं.

Vasant More attacked cm Eknath Shinde
Operation Tiger Returns? : 'ऑपरेशन टायगर'चं मला काहीच माहिती नाही; शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, वाढवलं राजकीय टेन्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com