Sanjay Raut Controversy : संजय राऊतांवर सामूहिक नाराजीचा स्फोट? ठाकरेंच्या पक्षाला पदाधिकाऱ्यांचा रामराम; 12 जुलैला शिंदे शिवसेनेत मोठा प्रवेश?

Another major setback for Uddhav Thackeray as senior Shiv Sena UBT leaders from Ahilyanagar resign and prepare to join Eknath Shinde-led Shiv Sena : यवतमाळनंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यातही निष्ठावान शिवसैनिकांनी ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा कल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळताना दिसत आहे.
Sanjay Raut Controversy
Sanjay Raut Controversy Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Split Maharashtra : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल करत पुढे सरकत असतानाच त्यांच्या पक्षाला आणखी एक मोठा संघटनात्मक धक्का बसल्याचे समोर आले आहे.

यवतमाळनंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यातही निष्ठावान शिवसैनिकांनी ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा कल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळताना दिसत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील पक्षाचे ज्येष्ठ जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना (Shivsena UBT) पक्षामधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात शिवेसना ठाकरे पक्षा मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रावसाहेब खेवरे यांच्यासोबत उत्तर जिल्हा उपप्रमुख रामहारी तिकांडे (अकोले), हरिभाऊ शेळके (नेवासे), सचिन बडधे (श्रीरामपूर Shrirampur), अनिल बांगरे (कोल्हार) यांच्यासह तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे (राहाता), मच्छिंद्र धुमाळ (अकोले), तालुका समन्वयक अशोक सातपुते (संगमनेर) आणि शहरप्रमुख डॉ. संजय म्हसे (राहुरी) यांनी सामूहिक राजीनामे सादर केले आहेत.

Sanjay Raut Controversy
Uddhav Thackeray Attack : ‘पळालाय… सापडला तर सोडू नका’; उद्धव ठाकरेंच्या फर्मानानं 'खाऊ'साहेब वाकचौरेंचं वाढलं टेन्शन

या राजीनाम्यांनंतर आता 12 जुलै रोजी शिर्डी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात खेवरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी अधिकृतपणे शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sanjay Raut Controversy
Bhausaheb Wakchaure Shirdi : खासदार वाकचौरेंविरोधात संताप! 'चप्पलांचा हार', ‘गद्दार’, 'लालची कुत्रा' म्हणत रास्ता रोको, तर विखे अन् खताळांचा थेट इशारा

रावसाहेब खेवरे हे तब्बल 38 वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले कट्टर शिवसैनिक मानले जातात. त्यांनी शाखाप्रमुख, राहुरी शहरप्रमुख, राहुरी तालुकाप्रमुख, उत्तर जिल्हाप्रमुख अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख राहिली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेत पहिली मोठी बंडखोरी झाली होती त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे यांनी खेवरे यांना आपल्या गटात येण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

राहुरी पोटनिवडणुकीत संधी नाकारली

दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी उमेदवारी न मिळाल्याने खेवरे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्मवर स्वाक्षरी केली होती. मात्र खासदार संजय राऊत यांनी उमेदवारी प्रक्रियेत अडथळा आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

रावसाहेबांची राऊतांवर नाराजी

राजीनाम्यानंतर रावसाहेब खेवरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. माझी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. मात्र खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल नाराजी आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे सांगितले की, 12 जुलै रोजी समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

पदाधिकाऱ्यांचे राजीनामा देताना कारणे

दरम्यान, मच्छिंद्र धुमाळ यांनीही उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत वैयक्तिक कारणांमुळे सक्रिय राजकारणातून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तर रामहारी तिकांडे यांनी घरगुती अडचणींमुळे फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला असून पक्ष किंवा नेतृत्वाबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अकोले इथल्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय

याचदरम्यान, अकोले शहरप्रमुख शिवाजी शेटे यांनीही कौटुंबिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ महेश नवले आणि प्रमोद मंडलिक हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली असून, अहिल्यानगरात शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com