

Pune News : काही दिवसांपुर्वी पिंपरी चिंचवड मध्ये पाकिस्तानी बनावटीची सौंदर्यप्रसाधने आढळून आली होती. त्यानंतर आता लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहाद पाठोपाठ आता 'कॉस्मेटिक जिहाद' सारखे नवीन संकट उभे राहत असल्याचा दावा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केला आहे.
मार्च महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा आढळून आला होता. याबाबत सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनामध्ये महेश लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. ही घटना केवळ व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता त्याकडे राष्ट्रसुरक्षेचा गंभीर धोका म्हणून पाहिले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका महेश लांडगे यांनी मांडली आहे.
शत्रू राष्ट्राची सौंदर्यप्रसाधने पिंपरी चिंचवड मध्ये पोचली आहेत. त्यामुळे शत्रू थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला असून अशा प्रकारे शहरात घुसखोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असून तो राजकीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हाणून पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सौंदर्यप्रसाधने पिंपरी चिंचवड पर्यंत कशा पद्धतीने पोचले याची सखोल चौकशी होऊन या सगळ्या मागचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक देखील आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत पोलिसांनी कारवाई करत 70 हून अधिक घुसखोरांना अटक केले आहे, मात्र ही कारवाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुदळवाडी परिसरात महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून तब्बल 900 एकर जागेवरील अनधिकृत अतिक्रमण केलेली भंगार दुकाने आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. मात्र, शहरातून हुसकावून लावलेले हे अवैध व्यावसायिक आता शहरा शेजारच्या गावांमध्ये आश्रय घेत आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत असे अवैध धंदे नकोत, असे ठराव करूनही हे धंदे फोफावत आहेत.
महेश लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सापडलेली पाकिस्तानी उत्पादने नक्की कोठे तयार होतात आणि ती महाराष्ट्रात आणि पिंपरी मध्ये कशी पोहोचली, याचा तपास करण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी सभागृहात दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.