CBI Raid on Anil Ramod : पालखी मार्गाचं भूसंपादन अनिल रामोडांच्या आलं अंगलट !

CBI Raid in Pune : रामोड यांच्या पुण्यातील घरातून मोठं घबाड 'सीबीआय'च्या हाती
CBI, Anil Ramod
CBI, Anil RamodSarkarnama

CBI Arrest Anil Ramod : पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना लाच प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई 'सीबीआय'ने केली. त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर 'सीबीआय'ने छापे टाकले. या कारवाईत 'सीबीआय'च्या हाती मोठे घबाड लागले आहे. (Latest Marathi News)

रामोड यांच्यावरील 'सीबीआय'ने केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली आहे. आता रामोड यांनी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पालखी महामार्गालगत असलेल्या जमीनीबाबत लाच मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने थेट 'सीबीआय'कडेच दाद मागितली. त्यानुसार 'सीबीआय'ने शुक्रवारी (ता. ९) रामोड यांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयासह पुणे आणि नांदेड येथील निवास्थानांवर छापे टाकण्यात आले.

CBI, Anil Ramod
Pune CBI Raid : पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्या कार्यालयावर 'सीबीआय'चा छापा

माळशिरस येथे तक्रारदाराची जमीन आहे. माळशिरसमधील पालखी महामार्गासाठी शासनाने त्यांचे भू-संपादन केले आहे. त्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी जमीन मालकाने अर्ज केला होता. हा मोबदला लवकर देण्यासाठी महसूलचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने थेट CBI 'सीबीआय'कडेच तक्रार केली. त्यानुसार 'सीबीआय'च्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला होता. या पथकाने रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेतना पकडल्याची माहिती समोर येत आहे.

CBI, Anil Ramod
CBI Raid In Pune : बाणेरमधल्या 'ऋतुपर्ण' सोसायटीत ‘सीबीआय’चे अधिकारी पोचले अन् घबाड हाती लागलं !

दरम्यान, पालखीमार्गाच्या भूसंपादनात अधिकाऱ्यांनी अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी यापूर्वी केला होता. विधीमंडळातही त्यांनी हा विषय उपस्थित केला होता. सुमारे दीड वर्षांपूर्वी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या आर्थिक गैरव्यावहाराची तक्रार करणारे निवेदन आमदार सातपुते यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले होते.

CBI, Anil Ramod
CBI Raid On Anil Ramod : अबब ! 'ऋतुपर्ण'वर पैशांचा पाऊस; पैसे मोजायला दीड डझन अधिकारी आणि दोन मशीन ?

याबाबत 'सरकरानामा'शी बोलताना सातपुते म्हणाले, "याबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांना भेटलो होतो. तक्रारही केली होती. मात्र आज अनिल रामोड यांच्यावर झालेली कारवाई माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने आहे की नाही याबाबत मला काही कल्पना नाही. भूसंपादनासंदर्भात आणखी कुणी तक्रार केली असेल तर मला त्याची माहिती नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com