Pune : पुणे महसूल विभागातील एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. यावेळी छाप्यानंतर काहीच वेळात पोलिसांनी पैसे मोजण्याचे दोन मशिन्स तर मागवलेच शिवाय पैसे मोजण्यासाठी काही बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले.
पुणे महसूल विभागा(Pune Revenue Department) चे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या घरी सीबीआयने शुक्रवारी (दि.९) छापे टाकले. यावेळी त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता सीबीआयने ताब्यात घेतलेल्या रामोड यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांनी किती मालमत्ता जमा केली असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या बाणेर गावातील ऋतूपूर्ण सोसायटीत दुपारी एकच्या सुमारास ‘सीबीआय’(CBI)चे सुमारे 10 ते 12 अधिकारी आले. यामध्ये काही महिला अधिकाऱ्यांच्या समावेश होता. सोसायटीच्या सुरक्षेला न जुमानता या आधिकाऱ्यांनी त्यांनी थेट इमारतीच्या ‘सी’ विंगमधील चौथ्या मजल्यावर जात रामोड यांच्या घराचा ताबा घेतला.घराचा दरवाजा लावून घेत त्यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ‘सीबीआय’(CBI)च्या आधिकाऱ्यांचा ताफा बाणेरमधील ऋतुपर्ण सोसायटीच्या प्रवेशद्वारात आला. सरक्षा यंत्रणेला न जुमानता त्यांनी थेट ‘सी’ विंगमधील रामोड यांच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट गाठला. घरात जाताच दरवाजा लावून घेतला.
सोसायटीचे सुरक्षा व्यवस्थापक तातडीने त्या ठिकाणी गेले. मात्र, महिला आधिकाऱ्याने दरवाजा उघडला व तपासणी सुरू आहे. तुम्ही थोड्या वेळाने या असे या आधिकाऱ्याने सुरक्षा व्यवस्थापकास सांगितले.
अधिकाऱ्यांनी एकाचवेळी रामोड यांचे पुण्या(Pune)तल्या विधान भवानातील कार्यालय तसेच क्विन्स गार्डन येथील सरकारी निवास्थान व बाणेर येथील घरावर छापा घातला. रामोड हे सुमारे दोन वर्षांपासून पुण्यात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत.त्यांच्याबाबत लाचखोरीच्या आलेल्या तक्रारीनंतरही आज अचानक ही कारवाई करण्यात आली.
बाणेरमधील या सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी राहतात. विशेषत: राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनेक आधिाकाऱ्यांचा निवास या सोसायटीत आहे. परिणामी या सोसायटीत नेहमीच व्हीआयपींचा वावर असतो. मात्र, आज दुपारी अचानक अनेक मोटारीतून सीबीआयचे अधिकारी आले. त्यांनी सोसायटीच्या कोणत्याच यंत्रणेला न जुमानता अनिल रामोड(Anil Ramod) यांच्या घराचा ताबा घेतला.
त्यामुळे काहीवेळ सोसायटीत गोंधळा उडाला नेमके काय सुरू आहे. याचा अंदाज कुणालाच नव्हता. सीबीआयने रामोड यांच्या घरात छापा टाकल्यानंतर काहीवेळातच पोलिसांनी पैसे मोजण्याचं मशीन मागवलं असल्याची माहिती समोर येत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.