Rohit Pawar on Munde : मुंडे बंधू-भगिनीला आमदार रोहित पवार यांचा टोला, ‘हे शोभत नाही...’

Lok Sabha Election 2024 : पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर, गुंडाराज चालणार का? निवडणूक आयोग गुंडगिरीला चाप लावणार आहे की, केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? असे सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
Rohit Pawar-Pankaja Munde-Dhananjay Munde
Rohit Pawar-Pankaja Munde-Dhananjay MundeSarkarnama

Beed Lok Sabha News : बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तसे व्हिडिओ शेअर केले आहेत. भाजपच्या गुंडगिरीवर निवडणूक आयोग कारवाई करणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्याला ही दडपशाही शोभत नाही, असे म्हणत मुंडे बंधू-भगिनीला आमदार रोहित पवारांनी नाव न घेता टोला लगावला.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या ट्विटरवर गेल्या दहा तासांच्या अंतराने दोन पोस्ट शेअर केल्या. यात पाच व्हिडिओ शेअर केले आहेत. यात बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदानावेळी झालेल्या गैरप्रकारांकडे लक्ष वेधले. हे व्हिडिओ परळी विधानसभा मतदारसंघातील आहेत, असा दावा करत मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे, तसे मतदान भाजपने (BJP) गुंडांकडून करून घेतल्याचे दिसते. पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर, गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की, केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? असे सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar-Pankaja Munde-Dhananjay Munde
Ambadas Danve On Modi : भाजपकडून मोदींच्या सभेचा गवगवा, तर ठाकरेंच्या नेत्याने केले हे प्रश्न...

परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेतली गेल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. मतदान केंद्रावर गैरप्रकार झाले. या गैरप्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन गीते यांनी आवाज उठवला. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याचा हिम्मत दाखवली. याचे कौतुक आमदार रोहित पवार यांनी केले.

आमदार रोहित पवार यांनी या वेळी निवडणूक आयोगाला देखील चांगलेच सुनावले आहे. निवडणूक आयोग फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे. या प्रकारांची निष्पक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी करणार आहे की, फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत, असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये मुंडे बंधू-भगिनींचे नाव न घेता लगावला.

Rohit Pawar-Pankaja Munde-Dhananjay Munde
Tanaji Sawant : फडणवीसांना जाहीर सभेत दिलेला शब्द तानाजी सावंत कसा पूर्ण करणार?

दरम्यान, महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी देखील मतदानातील गैरप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. काही भागात मतदान केंद्र ताब्यात घेतले गेले. विशेष करून परळीत मतदान केंद्र ताब्यात घेतले गेले आहे. या भागातील १९ गावांमध्ये फेरमतदान घ्यावे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Rohit Pawar-Pankaja Munde-Dhananjay Munde
Beed Lok Sabha Analysis : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीड लोकसभा निवडणुकीच्या विजयाचे 'असे' आहे गणित..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com