Sanjay Jagtap: पक्ष बदलला पण माणसं ठेवली! संजय जगतापांमुळे पुणे काँग्रेसमध्ये गोंधळ

Sanjay Jagtap: नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Sanjay Jagtap
Sanjay Jagtap sarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय जगताप यांनी अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संजय जगताप यांनी जरी पक्षाला रामराम केला असला तरी त्यांच्या मर्जीतील काही लोक त्यांनी काँग्रेसमध्ये ठेवले असून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Sanjay Jagtap
Maharashtra Honey Trap Case: 'हनी ट्रॅप'मध्ये अडकलेले कोण आहेत 'ते' चार मंत्री? कोणत्या नेत्याकडं काय आहे माहिती?

संजय जगताप यांनी काँग्रेसमधून राजीनामा देण्यापूर्वीच कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीतील कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी नेमल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, हे नियुक्त पदाधिकारी सध्या देखील काँग्रेस पक्षाऐवजी संजय जगताप यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याची टीका होत आहे.

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यावर टीका करू नये, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे ते अजूनही संजय जगताप यांच्या गोटातील असल्याची भावना स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संजय जगताप यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेली जिल्हा कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Sanjay Jagtap
Narayan Rane Clean Chit: नारायण राणेंना दोन गुन्ह्यांमध्ये क्लीनचीट! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमकं काय घडलं होतं?

विशेष म्हणजे, भाजपमध्ये प्रवेश करताना संजय जगताप यांनी "मी काँग्रेसमध्ये काही लोकांना ठेवले असून, वेळ आली की ते माझ्यासोबत येतील," असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर विद्यमान जिल्हा काँग्रेस कमिटी ही पक्षविचारांपेक्षा गटनिष्ठा जोपासणाऱ्यांनी भरलेली असल्याचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्व घडामोडींमुळे पुणे जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, पक्षश्रेष्ठींनी तातडीने लक्ष घालून नव्याने जिल्हा कार्यकारिणी स्थापन करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com