Maharashtra Honey Trap Case: 'हनी ट्रॅप'मध्ये अडकलेले कोण आहेत 'ते' चार मंत्री? कोणत्या नेत्याकडं काय आहे माहिती?

Maharashtra Ministers in Honey Trap: राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भर सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवत अनेक मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा केला होता.
Honey-Trap-News-
Honey-Trap-News-Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Ministers in Honey Trap: राज्यात सध्या मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं कथित प्रकरण जोरदार चर्चेत आहे. काँग्रेस नेत्यांनी याबाबत खळबळजनक दावे केले आहेत, पण अद्याप हे मंत्री आणि अधिकारी कोण आहेत? याचा खुलासा मात्र झालेला नाही. जर हा खुलासा झाला तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. या हनी ट्रॅपच्या चर्चेच्या अनेक थेअरीजही सांगितल्या जात आहेत. यामध्ये चार मंत्र्यांच्या नावाची चर्चा देखील सुरु आहे. याबाबत काही राजकीय नेत्यांनी काही खळबळजनक माहितीही दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, तसंच कोणाकडं याबाबत काय माहिती आहे जाणून घेऊयात.

Honey-Trap-News-
Narayan Rane Clean Chit: नारायण राणेंना दोन गुन्ह्यांमध्ये क्लीनचीट! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमकं काय घडलं होतं?

नेमकं प्रकरण काय?

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भर सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवत अनेक मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा केला होता. नाशिकच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर शेवटच्या आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यावर चर्चाही केली होती. हनी ट्रॅप वैगरे प्रकरण बोगस आहे, उगाचच सनसनाटी निर्माण करण्यासाठी याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं उगाचच अनेक मंत्री एकमेंकांकडं संशयानं पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. विरोधकांनी चर्चेत राहण्यासाठी या विषयाला हवा दिली असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी याला जास्त महत्व न देता विषय संपवलाच होता.

Honey-Trap-News-
Raksha Khadse Help: संभाजीनगरच्या कुटुंबावर पॅरिसमध्ये ओढवला बिकट प्रसंग! रक्षा खडसे मदतीला धावून आल्या अन्...

पण पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच पुन्हा या प्रकरणानं उचल खाल्ली. कारण या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचं एक तपास पथक नाशिकला रवाना झालं होतं. त्यानंतर याची पाळमुळं थेट जळगावपर्यंत पोहोचली. भाजपचा सदस्य असलेल्या प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा लोढा जळगाव जिल्ह्यातील जामनेरचा रहिवासी आहे. त्याच्यावर मुंबईत एक पॉक्सो कायद्यांतर्गत आणि दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅप प्रकरणी असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोढाच्या जामनेरच्या घरावर पोलिसांची छापेमारी करत त्याच्या घरातून लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि काही इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. तसंच साकीनाका पोलिसांनी चकाला इथल्या लोढा हाऊसमधून त्याला अटकही केली आहे.

Honey-Trap-News-
Manikrao Kokate : सतत वादात सापडणारे माणिकराव कोकाटे कोण आहेत?

जामनेरमध्ये असताना सुरुवातीच्या काळात या प्रफुल्ल लोढाचं आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगलं सख्य होतं. पण नंतर त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं, त्यानंतर त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी आपण एक बटण दाबलं तर सगळं काही उघड होईल असं महाजन यांचं नाव न घेता दावा केला होता. त्यानं एकनाथ खडसे यांनाही टार्गेट केलं होतं. त्यानंतर त्यानं पुन्हा भाजपशी जुळवून घेतलं.

Honey-Trap-News-
Mahapalika Elections: ...तर एकत्र लढू हे सांगता येणार नाही; काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका

कोणाचे दावे काय?

दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी दिशाभूल करत असल्याचं सांगत गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा एकत्रित फोटो ट्विट करुन खळबळ उडवून दिली तसंच या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राऊत यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! 'दुध का दूध, पानी का पानी' होईल! ४ मंत्री अनेक अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा) याच ट्रॅपमुळे पळाले, असा दावाही त्यांनी केला.

Honey-Trap-News-
Political drama in Maharashtra: इजा, बिजा, तिजा... शिवसेना, भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीच्याही नेत्याने दाखवली 'फायटिंग स्किल'

त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, प्रफुल्ल लोढा हा भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता होता, सात-आठ वर्षांपूर्वी. आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर वर्गातला होता. नंतर त्याचे राजकारण्यांशी आणि गिरीश महाजनांशी संबंध आला. या माध्यमातून सध्या तो ५०-६० कोटी रुपयांचा मालक असल्याचं म्हटलं जातं. प्रफुल्ल लोढा महाजनांना म्हणत होता की मी पोलिसांकडं मी तक्रार दिलेलीच आहे. जर एक बटण मी दाबलं तर सारं उघडकीस येईल. तसंच ट्रायडंट हॉटेलला काय काय केलं ते सर्व जगाला सांगेल असा त्यानं दावा केल्याचं खडसे यांनी सांगितलं. दुरावा झालेला असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा भाजप प्रवेश देण्यात आला. हा चमत्कार कसा काय घडला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच त्याची प्रॉपर्टी कशी वाढली? याचीही चौकशी करायला हवी असं खडसे यांनी म्हटलं आहे.

तसंच हा हनीट्रॅपचा विषय वेगळा आहे, यामध्ये अधिकारी वैगरे नाही दिसत यात अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे. या हनीट्रॅप प्रकरणाची मुख्यमंत्री खोलात जाऊन चौकशी करतील अशी मला आशा आहे. यासाठी एसआयटी स्थापन करावी त्यामार्फत खोलवर जावं यातून एकामागून एक गोष्टी बाहेर येतील. मला माहिती आहे पण मी दाव्यानं सांगू शकत नाही. याचे धागेदोरे महाजनांपर्यंत पोहोचू शकतात असं मी आज असं म्हणू शकत नाही, पोलिसांनी याचा तपास करावा, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Honey-Trap-News-
Narendra Modi CM to PM : 14 वर्षे CM, 11 वर्षे PM; 25 वर्षांपासून न थांबलेलं 'मोदी पर्व'

तसंच या हनी ट्रॅप प्रकरणावर भाजचे नेते आणि मत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. बावनकुळे म्हणाले, लोकांची करमणूक करण्याचा हा प्रकार आहे. इतका गंभीर विषय आहे तर विरोधक सभागृहात का बोलले नाहीत, इतके दिवस का थांबले? यात अडकलेले चार मंत्री कोण? हे मला माहीत नाही, ज्यांनी आरोप केलेत त्यांनाच विचारा. सीडी लावा नाही तर काही कर कोणी घाबरणार नाही. खडसेंच्या आरोपांवर बोलताना काही नेत्यांना स्फोटक वक्तव्ये करण्याची सवयच लागली आहे, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com