Pune News : नदी काठ सुधारच्या कामाचा मार्ग मोकळा; 'या' महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर कोणते होते आक्षेप ?

Political News : पुणे महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प गेल्या अनेक दिवसापासून परवानगी मिळत नसल्याच्या कारणावरून रखडला होता. मात्र, या प्रकल्पाला पर्यावरण परवानगी मिळाल्यानंतर नदी सुधारच्या कामातील अडथळे दूर होणार आहेत.
Pune River
Pune River Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला सुधारित पर्यावरण परवानगी मिळाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने याविरोधातील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे महापालिकेला या प्रकल्पांचे काम वेगात करता येणार आहे. पुणे महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प गेल्या अनेक दिवसापासून परवानगी मिळत नसल्याच्या कारणावरून रखडला होता. मात्र, या प्रकल्पाला पर्यावरण परवानगी मिळाल्यानंतर नदी सुधारच्या कामातील अडथळे दूर होणार आहेत.

महापालिकेने संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यान नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम मार्च 2022 मध्ये सुरु केले आहे. संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंतच्या टप्प्याने काम 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बंडगार्डन ते मुंढवा पूल या दरम्यानचे काम 27 टक्के झाले आहे.

नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी याविरोधात मोहीम उघडली होती. तरीही महापालिकेने काम सुरु ठेवल्याने सारंग यादवडकर यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) याचिका दाखल केली होती. त्यामध्ये झालेल्या सुनावणीत नदीला पूर येथे, वृक्षतोड यासह अन्य प्रकारचे पर्यावरण विषयक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यावर एनजीटीने महापालिकेला (Pune PMC) सुधारित पर्यावरण परवानगी आणल्यानंतर कामे करावेत असे आदेश दिले होते.

या आदेशामुळे नदीकाठ झाडांची छाटणी, वृक्षतोड यासह त्यांचे पुनर्रोपण करणे ही कामे करता आली नाहीत. त्यामुळे अन्य कामेही थांबली होती. पुणे महापालिकेने सुधारित पर्यावरण परवानगी मिळविण्यासाठी पुरस्थितीसंदर्भातील तांत्रिक माहितीसह राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अॅथोरीटीकडे -सिया) अहवाल सादर केला होता. पण ‘सिया’चे सदस्य नियुक्त झाले नसल्याने त्यावर सुनावणी होऊन महापालिकेला परवानगी मिळण्यास उशीर होत होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सिया’कडे झालेल्या सुनावणीमध्ये महापालिकेने सादर केलेला आराखडा योग्य असल्याने पर्यावरण परवानगी देण्यात आली. पुणे महापालिकेने ही सुधारित पर्यावरण परवानगी एनजीटीमध्ये सादर केली. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये यादवडकर यांनी केलेली याचिका फेटाळून लावली. त्यामुळे या प्रकल्पाचे उर्वरित काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेतर्फे एनजीटीमध्ये ॲड. राहुल गर्ग यांनी बाजू मांडली.

Pune River
Mahayuti News : लाडक्या बहिणींचे देवेंद्र मोठे तर एकनाथराव लहान भाऊ; बीडच्या पोस्टरमधून अजित पवार तर गायबच

‘‘पुणे महापालिकेने ‘सिया’कडून सुधारित पर्यावरण परवानगी मिळवल्यानंतर ती एनजीटीमध्ये सादर करण्यात आला. त्यामुळे एनजीटीने महापालिकेविरोधात दाखल झालेली याचिका फेटाळून लावली आहे. संगमवाडी ते मुंढवा पूल या दरम्यानची उर्वरित कामे करण्यास यामुळे वेग येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

नदी काठ सुधार प्रकल्प

नदीकाठ सुधार प्रकल्पाची लांबी 44 किलोमीटर आहे. त्यासाठी एकूण खर्च 4 हजार 727कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे टप्पे 11 आहेत. सध्या संगमवाडी ते बंडगार्डन 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. बंडगार्डन ते संगमवाडी 27 टक्के काम पूर्ण झाले आहे. बाणेर ते औंध दरम्यानच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे.

Pune River
Mahayuti News : भाजपचा 160 जागांवर दावा; महायुतीमध्ये जागावाटपावरून पेच

पुण्यातल्या नद्यांची सद्यस्थिती कशी आहे ?

पुण्यातून वाहणाऱ्या नद्यांना सध्या नाल्याचे स्वरूप आले आहे. वाढते नदीकाठचे शहरीकरण, प्रक्रीया न झालेले सांडपाणी तसेच नद्यांमध्ये सोडले जाणे, नदीपात्रात कचरा टाकणे यामुळे नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

नदीसुधार प्रकल्पावर कोणते आक्षेप घेण्यात आले आहेत?

या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हापासूनच यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले पुण्यातले पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर यांनी मुळा मुठा नदीसुधार प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली होती. याविरोधात ते कोर्टातही गेले आहेत. या प्रकल्पामुळे नद्यांचं काँक्रिटच्या कालव्यात रुपांतर होईल असा आरोप यादवडकर यांनी केला आहे. त्याच सोबत या प्रकल्पामुळे नद्यांची पूर पातळी वाढण्याची शक्यता असल्याचा धोकाही त्यांनी वर्तवला होता.

नदीसुधार प्रकल्पात 6 हजार झाडांची कत्तल होणार?

यासगळ्या आक्षेपांसोबतच आता या प्रकल्पाच्या संदर्भात आणखी एक माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पाच्या कामात जवळपास 6 हजार झाडं बाधित होणार असल्याचा आरोप होत आहे.

Pune River
MVA News : 'मविआ'चे मुंबईचे जागावाटप जवळपास फायनल; राज्यातील जागांसाठी आजपासून सलग तीन दिवस जोर'बैठका'

आदित्य ठाकरे यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा

पुण्याच्या नदीसुधार प्रकल्पात सुमारे सहा हजार झाडे बाधित होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. या विषयावर आदित्य ठाकरे यांनी ट्वीटवर वरुन भाष्य केले आहे. “पुण्यातील धोकादायक रिव्हर फ्रंट डेवलपमेंट प्रकल्पाचा मुद्दा मी विधिमंडळांत मांडला. रिव्हरफ्रंट विकासासाठी सहा हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव! मुळात नदी पुनरुज्जीवन आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपल्या सर्वांना हवे असले तरी पर्यावरणवादी आणि नागरी नियोजकांनी अभ्यासलेला हा सध्याचा आराखडा पुण्याचा भूगोल, सांस्कृतिक इतिहास आणि पर्यावरण येणाऱ्या काळात नष्ट करेल,” असं ट्वीट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे.

आक्षेपांवर पुणे पालिकेची भूमिका काय आहे?

बाधित वृक्षांच्या मुद्द्यावर पुणे पालिकेने भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकल्पामुळे बाधित वृक्षांच्या बदल्यात पुणे पालिका तब्बल 65 हजार स्थानिक प्रजातींचे वृक्ष लागवड केली जाईल, असे पुणे पालिकेने सांगितले आहे.

Pune River
Pimpri Political News : पिंपरीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा; अजितदादांचा कट्टर समर्थक आमदार अडचणीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com