Pimpri Political News : पिंपरीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा; अजितदादांचा कट्टर समर्थक आमदार अडचणीत

Political News :पिंपरी विधानसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाद रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
shrirang Barne, Anna Bansode
shrirang Barne, Anna Bansode Sarakarnama
Published on
Updated on

Pimpri News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांकडुन एकमेकाना लक्ष करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे .

महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच आता येत्या काळात पिंपरी विधानसभेच्या जागेवरून शिवसेना (Shivsena) शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाद रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या (Anna Bansode) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

shrirang Barne, Anna Bansode
Mahayuti News : लाडक्या बहिणींचे देवेंद्र मोठे तर एकनाथराव लहान भाऊ; बीडच्या पोस्टरमधून अजित पवार तर गायबच

महायुतीमध्ये पिंपरी विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. त्या ठिकाणी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. मात्र: विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट करणार असल्याचे समजते.

या जागेबाबत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी दावा केला आहे. यामुळे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. बनसोडेंच्या बाबतीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात मोठी नाराजी आहे, हे पाहता महायुतीचा एक आमदार कमी होऊ द्यायची नाही, म्हणून आम्ही पिंपरीची मागणी करणार आहोत.

shrirang Barne, Anna Bansode
Shivsena UBT Vs BJP : 'मोदींनी 10 वर्षांत पेरलेलं विष उगवलं...' राहुल गांधींवरील टीकेचा 'सामना'मधून समाचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडतील असा दावा ही खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या दाव्यामुळे येत्या काळात महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कॊणाच्या वाट्याला येणार याची उत्सुकता लागली आहे. जागावाटपाची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असून काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

shrirang Barne, Anna Bansode
MVA Politics Video : मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंकडेच? काँग्रेस-शरद पवार गटाला नवा प्रस्ताव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com