Mahayuti News : भाजपचा 160 जागांवर दावा; महायुतीमध्ये जागावाटपावरून पेच

Political News : महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलेही मतभेद नाहीत, 80 टक्के जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे दावे केले जात आहेत.
Mahayuti Leader
Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलेही मतभेद नाहीत, 80 टक्के जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे दावे केले जात असले तरी भाजपने किमान 160 जागांची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सारेकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटनुसार जागा वाटप करावे, अशी मागणी केली आहे. भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी दोन दिवसांपूर्वी विजयाची शक्यता हाच आमचा फॉर्म्युला राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी बावनकुळे यांनी महायुतीचे तीनही नेते पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करणार असल्याचे सांगितले.जागा वाटपावरून ब्रेकिंग न्युज मिळणार नाही, असाही दावा त्यांनी केला होता. आता मात्र नवीनच माहिती समोर आली आहे. (Mahayuti News)

भाजपने 2019 च्या निवडणुकीत 160 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 105 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्या सर्व जागा भाजपल्या हव्या आहेत. यावरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महायुतीमध्ये आता शिवसेनेसह अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले आहेत. त्यामुळे महायुतीसमोर जागा वाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रत्येकच पक्षाला जागा वाढवून हव्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनीसुद्धा 40 आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा लढती झाल्या होत्या. आता त्यांच्यावर एकमेकांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे.

Mahayuti Leader
Mahayuti News : लाडक्या बहिणींचे देवेंद्र मोठे तर एकनाथराव लहान भाऊ; बीडच्या पोस्टरमधून अजित पवार तर गायबच

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादींच्या मतांचा तर राष्ट्रवादीला भाजपच्या मतांचा फारसा फायदा झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये, अशी मागणी केली जात आहे. मात्र, महायुतीचे नेते एकत्रित लढण्यावर ठाम आहेत. अजित पवार महायुतीत आले तेंव्हा काही स्पष्ट नव्हते. कार्यकर्ते संभ्रमात होते. आता बरीच स्पष्टता आली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांचा फायदा होईल, असा दावा केला जात आहे.

Mahayuti Leader
Kangana Ranaut News : विरोधकांवर सोडलेल्या 'क्वीन अस्त्रा'ने दिशा बदलली; भाजपचाच वेध घेणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com