PCMC Water Problem : धरण भरलं तरी पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाई; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

Mahesh Landge And Bala Bhegde : बंद जलवाहिनीला लांडगेची होकार तर भेगडेंचा नकार
Nana Kate, PCMC
Nana Kate, PCMCSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलथवून मार्च २०१७ मध्ये भाजप सत्तेत आली. सत्तेत येताच दीड वर्षांनी भाजपने शहराचा दररोज होणारा पाणीपुरवठा बंद करून २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड सुरु केला. तो अद्याप कायम आहे. आता शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण भरले आहे. यावर दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दररोज करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केली जाऊ लागली आहे. (Latest Political News)

महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी काटे यांनी पालिका प्रशासनासह भाजपवर आरोप करत टीकाही केली आहे. काटे म्हणाले, आता पवना धरण भरले असतानाही नागरिकांना दिवसाआड पाणी मिळते. पुरेशे पाणी असतानाही पिंपरी-चिंचवडकरांवर कृत्रिम पाणीटंचाईची टांगती तलवार कशासाठी?", असा प्रश्नाही काटेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

Nana Kate, PCMC
BJP Issues whip to MP: भाजपची सावधगिरी; अविश्वास ठराव चर्चेसाठी खासदारांना व्हीप जारी

"कटिबद्ध जनहिताय हे पिंपरी पालिकेचे ब्रीद वाक्य असल्याने त्यानुसार योग्य सुविधा तसेच समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे", अशी अपेक्षा व्यक्त करताना काटेंनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. ते म्हणाले, प्रशासन व त्यातही पाणीपुरवठा विभागाचा मनमानी, नियोजनशून्य कारभार सुरू आहे. यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असताना शहरात पाणीटंचाई निर्माण केली जाते. शहरातील टँकर लॉबीला फायदा होण्यासाठी पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणीचे कारण देत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली", असाही आरोप काटेंनी केला आहे.

Nana Kate, PCMC
Assembly Session : शिवेंद्रराजेंनंतर बाळासाहेब पाटील आक्रमक; म्हणाले, तासवडे टोल नाक्यावर सवलती द्या

शहरातील पाण्याची काय आहे स्थिती ?

पिंपरी-चिंचवडला मिळणारे पाणी आणि वाढत्या नागरिकरणामुळे शहराला लागणारे पाणी यात मोठी तफावत आहे. यासाठी शहराला अतिरिक्त २६७ एमएलडी पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून त्यापैकी फक्त शंभर एमएलडी अधिकचे मिळालेले आहे.

दुसरीकडे पवना धरणातून नदीत पाणी सोडण्यात येते. ते ४२ किलोमीटरवरील शहरात येईपर्यंत पाण्याचा खूप अपव्यय होतो. धरणातून पाणी बंद जलवाहिनीतून आणण्याची योजना सुरु केली होती, पण, तिलाही भाजपने मावळात खोडा घालून बंद पडली. ती पुन्हा सुरु करावी अशी मागणी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली असली तरी भाजपच्याच मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी या योजनेला आपला विरोध कायम ठेवला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.