Pune Politics : धंगेकर-बिडकरांमधली 'दुश्मनी' रूपाली पाटलांनी संपवली ? दोघांना एकत्र आणले, फोटो काढले अन् शेअरही केले

Ravindra Dhangekar : वाॅर्ड ऑफिसमध्येच धंगेकर आणि बिडकर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रसंग घडला होता.
Ravindra Dhangekar, Rupali Patil,  Ganesh Beedkar, Siddharth Dhende, Ashok Haranaval
Ravindra Dhangekar, Rupali Patil, Ganesh Beedkar, Siddharth Dhende, Ashok Haranaval sarkarnama
Published on
Updated on

Pune : महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीपासून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर (Ganesh bidkar) यांच्यात ‘छत्तीस’चा आकडा आहे. म्हणजे, तेव्हा निवडणुकीत वाॅर्ड ऑफिसमध्येच धंगेकर आणि बिडकर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रसंग घडला होता. या निवडणुकीत या दोघांत भडकलेला वाद अजूनही शमलेला नाही. तेव्हा, धंगेकर-बिडकर हे कधीच एकत्र येऊच शकणार नाहीत; राजकीयदृष्टया सोडा. ते कधी एकमेकांची सावलीही बघणार नाहीत, इतके टोकाचे वाद त्यांच्यात आहेत. हे साऱ्या पुण्याच्या राजकीय वर्तुळाला चांगलेच ठाऊक आहे.

पण, धंगेकर-बिडकर एकत्र आणि त्यांनी फोटोसेशनही केले. यावर कोणाचाच विश्‍वास बसणार नाही; पण हे खरे आहे. गंमत म्हणजे, या दोघांना एकत्र आणून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी ग्रुप फोटोसेशनही केले.

फोटोसेशनच्या निमित्ताने 5-10 मिनिटे धंगेकर-बिडकर एकत्र आले; पण कोणीच कोणाकडे पाहिले नाही. त्यामुळे या दोघांमधील राजकीय ‘दुश्‍मनी’ कायम असल्याचे या भेटीनंतरही ठळकपणे दिसून आले. महापालिकेच्या आवारात गुरूवारी सायंकाळी पावणेसहा वाजता धंगेकर, बीडकर रुपाली पाटील, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नीलेश निकम,अशोक हरणावळ यांची भेट झाली.

Ravindra Dhangekar, Rupali Patil,  Ganesh Beedkar, Siddharth Dhende, Ashok Haranaval
Baramati Politics : अजितदादांनी भोसले कुटुंबीयांस न्याय दिला अन्‌ वडिलांचे स्वप्न मुलाच्या रूपाने पूर्ण झाले...

धंगेकर-बिडकर हे कसब्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. महापालिकेच्या राजकारणात दोघांचेही वजन आहे. वर्चस्व वाढविण्याच्या स्पर्धेत धंगेकर-बिडकर यांच्यात संघर्ष झडला. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत धंगेकरांनी अपक्ष लढत बिडकरांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर हे ‘जायंट किलर’ ठरले. या निवडणुकीतील धक्क्याने बिडकरांचे राजकारण संपल्याचे बोलले गेले. पण, तसे घडले नाही. मागच्या दाराने अर्थात, स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेच्या राजकारणात स्थान कायम ठेवलेल्या बिडकरांनी महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे सभागृह नेतेपद मिळविले.

बदल्याचे राजकारण करणाऱ्या धंगेकरांनी बिडकरांना मिळालेल्या पदाविरोधात थेट कोर्टात धाव घेतली. महापालिकेतील भाजपचा सत्ता संपल्यानंतर कोर्टाचा निकाल आला आणि त्यात बिडकरांचे पद बेकायदा ठरविण्यात आले. यानिमित्तानेही धंगेकर-बिडकर यांच्यातील वादाला धार आली.

पुढे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही धंगेकरांना धडा शिकविण्याची बिडकर यांची व्यूहनीती होती. त्यात ऐन मतदानादिवशीच बिडकरांनी धंगेकरांच्या कार्यकत्याला मारहाण केल्याचा आरोप झाला. त्यावरून धंगेकर-बिडकर यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली. या निवडणुकीत धंगेकर आमदार झाले आणि बिडकरांचे राजकारण संपविण्याची भाषा उघडपणे बोलून दाखवू लागले आहे.

परिणामी, धंगेकर-बिडकर यांच्यातील राजकीय सामना रंगण्याची चिन्हे असतानाच, महापालिकेत गुरुवारी सायंकाळी वेगवेगळ्या कामानिमित्त रुपाली पाटील, बिडकर, धंगेकर, धेंडे, हरणावळ आले होते. ही सगळी मंडळी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांजवळ भेटली आणि त्यांच्यात गप्पा रंगल्या. तेवढ्यात धंगेकरही आपल्या कार्यकर्त्यांसोबत महापालिकेत आले. धंगेकरांना पाहून रुपाली पाटलांनी हाक मारली आणि त्यांना बोलावले.

Ravindra Dhangekar, Rupali Patil,  Ganesh Beedkar, Siddharth Dhende, Ashok Haranaval
Pune Public issue: नववर्षात पुणेकरांवर येणार 'हे' संकट

रुपाली पाटलांजवळ बिडकर असल्याने धंगेकर येण्याची शक्यता कमी होती. किंवा धंगेकर आलेच; तर बिडकर निघून जाण्याची चिन्हे होते. परंतु, दोघेही काही मिनिटे ग्रुपसोबत बोलत राहिले. पण एकमेकांकडे पाहिले नाही. त्यानंतर रुपाली पाटलांच्या आग्रहाखातर धंगेकर-बिडकरही फोटोसाठी तयार झाले. तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यांवर ओढून-ताणून आणलेले हसू दिसले.

फोटोसेशन संपले. धंगेकर-बिडकर आपापल्या वाटेने निघाले आणि रुपाली पाटलांनी धंगेकर-बिडकर जोडीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या घटनेने धंगेकर-बिडकर हे सहा-साडेसहा वर्षांनी आमने-सामने आले असावेत. याआधी महापालिकेत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी बोलविलेल्या एका बैठकीत धंगेकर-बिडकर होते. मात्र, आमदारांच्या बैठकीला बिडकरांना का बोलावले, असा आक्षेप घेऊन धंगेकरांनी पाटलांच्या बैठकीचा निषेध केला होता.

(Edited By Roshan More)

Ravindra Dhangekar, Rupali Patil,  Ganesh Beedkar, Siddharth Dhende, Ashok Haranaval
Maratha Reservation : 'ओबीसी'तून आरक्षण हवं हा हट्ट कशासाठी? - भूषणसिंहराजे होळकरांचा सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com