Vikram Bhosale
Vikram Bhosale Sarkarnama

Baramati Politics : अजितदादांनी भोसले कुटुंबीयांस न्याय दिला अन्‌ वडिलांचे स्वप्न मुलाच्या रूपाने पूर्ण झाले...

kharedi-Vikri Sangh Election : शिवाजीराव भोसले आणि आनंदराव भोसले यांची सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदाची दावेदारीही थोडक्यात हुकली होती.

Baramati News : बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, वाणेवाडी येथील विक्रम आनंदराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद विक्रम यांना देऊन भोसले कुटुंबीयांना न्याय दिला आहे. त्यामुळे विक्रम भोसले यांचे वडिल आनंदराव भोसले यांचे अध्यक्षपदाचे स्वप्न त्यांचे मुलाच्या रूपाने पूर्ण झाले आहे. (Selection of Vikram Bhosale as President of Baramati kharedi-Vikri Sangh)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे १९६७ च्या अगोदरपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून वाणेवाडी येथील आनंदराव भोसले हे ओळखले जात होते. बारामती तालुक्यातील करंजेपूल भागात खरेदी विक्री संघाची शाखा काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. आनंदराव भोसले यांची निष्ठा आणि काम पाहून अजित पवार यांनी सलग दहा वर्षे त्यांना संघाच्या संचालकपदावर काम करण्याची संधी दिली होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Vikram Bhosale
Solapur BJP : ‘उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणारे खासदार अन राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

भोसले यांच्या भावकीमधील ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव भोसले, रमेश भोसले आणि बाबासाहेब भोसले हेही प्रत्येकी पाच वर्ष संघाचे संचालक होते. मात्र, वाणेवाडीच्या भोसले कुटुंबीयांना संघाचे अध्यक्षपद मात्र मिळाले नव्हते. तसेच, शिवाजीराव भोसले आणि आनंदराव भोसले यांची सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदाची दावेदारीही थोडक्यात हुकली होती.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर भोसले कुटुंबीयांतील एकालाही उमेदवारी मिळाली नव्हती. कारखान्याच्या इतिहासात १९९२ पासून प्रथमच संचालक मंडळ हे भोसले यांच्याशिवाय बनले होते. त्यामुळे वाणेवाडी येथील भोसले कुटुंबीय आणि भावकीमध्ये काहीसी अस्वस्थता होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथम बारामती खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी आणि त्यानंतर अध्यक्षपदी विक्रम भोसले यांची नियुक्ती करून ती अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

 Vikram Bhosale
Maharashtra Next CM : मुख्यमंत्री कोण होणार? बावनकुळेंचे दिल्लीकडे बोट...

'माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण झाले'

बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून आमचे बंधू दिवंगत आनंदराव भोसले यांनी काम पाहिले आहे. तसेच ते सोमेश्वर कारखान्याचेही दहा वर्ष संचालक होते. या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षपदाने त्यांना हुलकावणी दिली होती. आता विक्रम भोसले यांना खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षदावर संधी देऊन पक्षाने आमच्या भावाचे स्वप्न पूर्ण केले, असे भोसले कुटुंबातील ज्येष्ठ पोपटराव भोसले यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

 Vikram Bhosale
Dharashiv Loksabha : सुभाष देशमुखांच्या मुलाचे धाराशिवमध्ये झळकले भावी खासदार म्हणून बॅनर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com