Schoolgirl Knife Attack : इन्स्टाग्रामवर डान्स व्हिडिओ व्हायरल करताच वाद उफळला; डिलिट करण्याच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकू हल्ला, शाळा प्रशासन हादरलं

Instagram Video Dispute Leads to Knife Attack on Schoolgirl in Mahalunge : पिंपरी-चिंचवडमधील नामांकित शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीवर धारदार चाकूने वार केल्याचा आरोप; जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, बावधन पोलिसांकडून कारवाई.
Schoolgirl Knife Attack
Schoolgirl Knife AttackSarkarnama
Published on: 
Updated on: 

School violence Maharashtra : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे येथे एक अत्यंत धक्कादायक घटना काल घडली आहे.

एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गमैत्रिणीवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्यातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

इंस्टाग्राम या समाज माध्यमावर (Social Media) अपलोड केलेला व्हिडिओ डिलिट करण्यासाठी भाग पाडल्याच्या प्रकारातून विद्यार्थ्याने हा चाकू हल्ला केला. 17 आणि 18 ऑक्टोबरला महाळुंगे येथील एका नामांकित शाळेची सहल ही पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी गेली होती. त्या दरम्यान तिथे विद्यार्थिनी डान्स करत असताना व्हिडिओ तयार करून, विद्यार्थ्याने आपल्या इंस्टाग्रामवर टाकला होता.

यानंतर या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये (Student) वाद झाला. त्यानंतर विद्यार्थ्याला तो व्हिडिओ डिलिट करावा लागला होता. याचाच राग मनात धरून विद्यार्थ्याने आपल्या वर्गमैत्रिणीवर धारदार चाकूने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. विद्यार्थिनीच्या छातीवर व चेहऱ्यावर चाकूने वार केले. नववीच्या वर्गातील विद्यार्थी आहे.

Schoolgirl Knife Attack
Pradeep Purnekar murder investigation : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; पिस्तुले यूपीमधून, तर चॉपर मुंबईतून खरेदी

जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती काहीशी स्थिर आहे. तसेच या प्रकरणात बावधन पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाने हल्लेखोर विद्यार्थ्याला बडतर्फ केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बॅग तपासणीचे नियम अधिकच कडक केले आहेत.

Schoolgirl Knife Attack
Ahilyanagar firing : अहिल्यानगर हादरलं! फ्लॅटमध्ये घुसून महिलेवर गोळीबार; काही तासांत गोळीबार करणाऱ्या तरुणाचाही मृत्यू

विद्यार्थिनीच्या घरातील लोकं उच्च शिक्षित आहे. तर विद्यार्थ्याकडील आईवडील देखील उच्च शिक्षित आहे. हल्लेखोर विद्यार्थ्याचे वडील एका नामांकित कंपनीत कार्यरत असून, उच्च पदावर आहेत. आपला पाल्य असे कृत्य कसा काय करू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसेनासा झाला आहे. या घटनेमुळे हल्लेखोर विद्यार्थ्याचे पालकांना देखील हादरला बसला आहे. पाल्यावर कायदेशीर कारवाई होत असल्याने, पालक अस्वस्थ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com