Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन होणार होते तसेच स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार होते.
हा दौरा रद्द झाल्याने आता शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्ग कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल आहे. या पार्श्वभूमी वर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा रद्द झाला असून त्यांच्या हस्ते जी उद्घाटन करण्यात येणार होती ती देखील रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रोच्या टप्प्याटप्प्याच्या उद्घाटना येत आहेत या कार्यक्रमांमुळे कोट्यावधींचा चुराडा होत आहे.
हा रद्द झाला असला तरी कोट्यावधींचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यालयात बसून हे उद्घाटन करता आले असते यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारे उद्घाटन केली आहे. झालं असतं तर कोठावधींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला नसता.
आता राजकारण बाजूला ठेवून मेट्रोचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मेट्रो मार्ग नागरिकांसाठी खुला करावा आणि पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊन लोकांच्या पैशाचा चुराडा करू नये अशी मागणी सरकारकडे धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केले आहे. मेट्रोमध्ये जे पक्षीय राजकारण सुरू आहे.
ते अत्यंत निंदणी आहे. काँग्रेस पक्षाने मेट्रोचा डीपी आर केला. मेट्रोची (Pune Metro) सुरुवात देखील काँग्रेसने केली मात्र कधीही जाहिरात बाजी केली नाही. त्यामुळे आता भाजप सरकारने ही जाहिरातीवर होणारा खर्च टाळावा आणि टप्प्याटप्प्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना उद्घाटनांना न बोलावता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन करावीत असा सल्ला धंगेकर यांनी दिला.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन यापूर्वी पालकमंत्र्यांनी केला आहे. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या स्मारकाचे पुन्हा एकदा भूमिपूजनाचा घाट सरकारने घातला होता. यातून सरकारला आम्ही पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करतोय हे दाखवायचे आहे मात्र हे महाराष्ट्रासाठी पूरक नाही, असं धंगेकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.