Vasant More News : वसंत मोरेंची लागणार कसोटी, भाजपा आमदार अन् अजिदादांचे शिलेदार लावणार 'ट्रॅप'!

PMC Election Vasant More VS BJP NCP : आगामी महापालिका निवडणुकीत वसंत मोरे यांना घेरण्याचा प्लॅन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदारांकडून करण्यात आला आहे.
Vasant More
Vasant More Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका (पीएमसी) निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांची धावपळ वाढली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी प्रभाग क्रमांक ३८ ड मधून उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे. याशिवाय, त्यांचा मुलगा प्रभाग क्रमांक ४० मधून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरक्षण सोडतीमुळे प्रभागांतील उमेदवारांची यादी स्पष्ट होत असून यामुळे स्थानिक राजकारणात नवीन चित्र रंगत येत आहे.

आरक्षण सोडतीनंतर प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर आंबेगाव कात्रज हा पाच सदस्यीय प्रभाग महिलांसाठी राखीव झाला आहे. यात तीन जागा महिलांसाठी तर दोन जागा पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. ओबीसी प्रवर्गातून दत्ता धनकवडे आणि युवराज बेलदारे हे उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असून खुल्या प्रवर्गातून वसंत मोरे आणि प्रकाश कदम हे लढणार आहेत.

भाजप देखील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही इन्कमिंग करून सगळे उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्या समोर भाजपच देखील मोठा आव्हान राहणार आहे.

दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ४० मध्ये आरक्षणाची रचना अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आरक्षण अशी आहे. यामुळे वीरसेन जगताप (अनुसूचित जाती), वृषाली कामठे (ओबीसी महिला), रंजना टिळेकर (सर्वसाधारण महिला) आणि संगीता ठोसर (सर्वसाधारण आरक्षण) यांच्या जागा सुरक्षित झाल्या आहेत. मात्र, या प्रभागात गंगाधर बधे हे भाजपमध्ये प्रवेश करून इच्छित असल्यामुळे स्थानिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Vasant More
Mira-Bhayander Politics : मिरा-भाईंदरमध्ये राजकीय कोलांट्याना सुरुवात;सरनाईक-मेहता भिडणार! ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न, काँग्रेसची धुरा हुसेनांकडे

याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांचा मुलगा प्रभाग क्रमांक 40 ड या सर्वसाधारण जागेवरून मैदानात असेल त्यामुळे वसंत मोरे यांना आणि त्यांच्या मुलाला प्रभागातून अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भाजपचा तगडे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

83 जागा महिलांसाठी राखीव

पुणे महापालिकेच्या एकूण १६५ सदस्यपदांसाठी ४१ प्रभागांतील आरक्षण सोडत मंगळवारी (११ नोव्हेंबर) जाहीर झाली होती. यात ८३ जागा महिलांसाठी (खुला ४८, ओबीसी २३, एससी ११, एसटी १) तर ८२ जागा पुरुषांसाठी (खुला ४८, ओबीसी २२, एससी ११, एसटी १) राखीव झाल्या आहेत.

Vasant More
Ajit Pawar Solapur politics : राजन पाटील-यशवंत मानेंच्या धक्क्यानंतर अजितदादा सोलापुरात करणार मोठा भूकंप, 'या' बड्या नेत्याचं इन्कमिंग?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com