

Pune Police patrolling to control crime: शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता पायी गस्तीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान १० ते १२ ठिकाणी पोलिसांकडून पायी गस्त घातली जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी आजपासून करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
आरोपी राहत असलेल्या परिसरांसह शहरातील प्रमुख बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये, मॉल, गर्दीची ठिकाणे, प्रमुख चौक तसेच यापूर्वी गुन्हे घडलेल्या परिसरांमध्ये पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढविण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. पोलिसांची नियमित पायी गस्त वाढल्याने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि संभाव्य गुन्हे रोखणे शक्य होणार आहे.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पायी गस्त महत्त्वाची असल्याचे पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांनी सांगितले. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्तीसाठी विशिष्ट ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत.
पायी गस्तीचे पथक दोन पुरुष अंमलदार किंवा एक पुरुष आणि एक महिला अंमलदार अशा स्वरूपाचे असेल. सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत ही गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गस्तीवर असलेले पोलिस अधिकारी आणि अंमलदार गणवेशात तसेच लाठीसह परिसरात पेट्रोलिंग करणार आहेत.
बाजारपेठांपासून शाळा-महाविद्यालयांपर्यंत आणि प्रमुख चौकांपासून गुन्हेप्रवण भागांपर्यंत पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढणार असल्याने नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. तसेच गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तींवर पोलिसांच्या उपस्थितीचा प्रतिबंधात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.