Lalit Patil News : पोलिसांनी ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा फास आवळला; नाशिकमधील भावाच्या कारखान्यावर छापेमारी

Mumbai Police Raid News : या कारवाईमुळे ड्रग्जमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
Lalit Patil News
Lalit Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्ज रॅकेट चालवणारा ड्रॅग्जमाफिया ललित पाटील पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आला त्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तो ससून रुग्णालयातून पळून नाही तर आरामात निघून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या बाबतीत आणखी एक मोठी माहिती समोर येत असून, त्याच्या भावाच्या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली आहे.

आरोपी ललित पाटीलच्या फरार होण्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्यांनी पाटील भोवतीचे फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यात आता मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) धडक कारवाई करत ललित पाटीलच्या बंधूच्या कारखान्यावर धाड टाकली आहे. या कारवाईत जवळपास कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Lalit Patil News
NCP Crisis News : अजित पवारांना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून शरद पवारांची मागणी मान्य ? घड्याळ चिन्ह गोठवणार नाही, तर...

शिंदे पळसे परिसरात ड्रग्जमाफिया ललित पाटील(Lalit Patil) याचा भाऊ भूषण पाटील यांचा श्री गणेशाय इंडस्ट्रीज या ड्रग्जनिर्मितीचा कारखाना आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी या कारखान्यावर छापेमारीची कारवाई करत भूषण पाटील यांच्यासह कामगारांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपये किमतीचे १३५ किलो ड्रग्ज(Drugs Racket)) जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे राज्यातील ड्रग्जमाफियांचे धाबे दणाणले आहेत. तसेच या कारवाईनंतर ड्रग्जमधील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश आहे. मुंबई पोलिसांनी थेट नाशिक पोलिसांच्या कार्यक्षेत्रात धडक कारवाई केली. कोट्यवधी रुपये किमतीचे १३५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण...?

ललित पाटील ससून रुग्णालयातून अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक किलो ‘एमडी’ची तस्करी करताना त्याच्यासह दोघांवर कारवाई केली होती. या प्रकरणात पाटीलसह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ रा. झारखंड) आणि रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मंडल आणि शेख यांना अटक केली होती.

मात्र, पाटील दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असून, उपचार घेत असल्यामुळे त्याला न्यायालयाच्या परवानगीने अटक करावी लागणार होती. तत्पूर्वीच तो उपचार घेत असलेल्या ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६मधून सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास फरारी झाला.

(Edited By Deepak Kulkarni)

Lalit Patil News
Supriya Sule News : खासदार सुप्रिया सुळेंची 'इंदापूर'वर विशेष नजर ? एकाच महिन्यात तिसऱ्यांदा दौरा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com