Supriya Sule News : खासदार सुप्रिया सुळेंची 'इंदापूर'वर विशेष नजर ? एकाच महिन्यात तिसऱ्यांदा दौरा

Indapur NCP Politics : ...धो धो कोसळणाऱ्या पावसातच सुळेंनी इंदापूर शहरातील तब्बल २२ मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेतले होते.
Supriya Sule
Supriya Sule Sarkarnama
Published on
Updated on

राजकुमार थोरात -

Indapur News : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार, नेत्या सुप्रिया सुळे यांचेदेखील बारामती लोकसभा मतदारसंघातील दौरे, भेटीगाठी वाढल्या आहेत.

अशातच सुळे यांचे इंदापूर तालुक्यातील दौरे वाढले असून, एकाच महिन्यात तिसऱ्यांदा ते तालुक्याच्या दौऱ्यावरती येत आहे. महिन्यातला हा तिसरा दौरा असल्यामुळे खासदार सुळे यांनी लोकसभा निवडणुकीआधी इंदापूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Supriya Sule
Praful Patel : राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट, ४३ आमदारांचा पाठिंबा !

गणेशोत्सवामध्ये खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी इंदापूर शहरामध्ये भेट देऊन गणपतीच्या आरतीमध्ये सहभाग घेतला होता. धो-धो पावसामध्ये गणेश उत्सव मंडळाला भेट दिल्याने सुळेंचे इंदापूर तालुक्यासह राज्यामध्ये कौतुक झाले. सुळे पवारांच्या पावलांवर पाऊल ठेवत काम करत असल्याचा अनुभव इंदापूरकरांनी अनुभवला.

शनिवारी खासदार सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या तालुक्यातील वकील संघटना, कंत्राटी कामगार व नगरपालिकेच्या कामगारांशी संवाद साधणार असून, मालोजीराजे यांच्या गढीची पाहणी करणार आहेत.

या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना भेटणार आहेत. शनिवारी दुपारी भिगवणपासून हा दौरा सुरू होत असून, दुपारी पावणेदोन वाजता भिगवणमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेत आहेत. दुपारी पावणे तीन वाजता इंदापूर (Indapur) शहरातील उपजिल्हा रुग्णालयास यशवंतराव चव्हाण सेंटर व प्रथम संस्था यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात येत आहेत.

दुपारी सव्वा तीन वाजता वकील संघटनेच्या कार्यालयास भेट देऊन वकिलांशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी चार वाजता इंदापूर नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी ऐकणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता मालोजीराजे गढी यांची पाहणी करणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामध्ये गढीचा बुरुजाचा काही भाग ढासळला होता. या पार्श्वभूमीवर गढीच्या संवर्धनासाठी खासदार सुळेंची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

‘ शोभते ना पवारसाहेबांची लेक...’

भल्या सकाळपासून सुरू झालेला दौरा...दिवसभर गाठीभेटींचा सिलसिला...मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी… भेटायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी… त्यातही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या सायंकाळी उशिराच इंदापूर शहरात पोचल्या…

Supriya Sule
Uddhav Thackeray's Members : उद्धव ठाकरेंच्या सदस्यांनी सभागृहातच फाडल्या ‘त्या’ कार्यक्रमाच्या पत्रिका !

धो धो कोसळणाऱ्या पावसातच त्यांनी इंदापूर शहरातील तब्बल २२ मंडळांच्या गणेशाचे दर्शन घेतले.. त्यांचे ते चित्र पाहून आपसूकच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली आणि ‘शोभते ना पवारसाहेबांची लेक...’ अशा प्रतिक्रियाही इंदापुरातील नागरिकांच्या ऐकायला मिळाल्या होत्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Supriya Sule
NCP Crisis : राष्ट्रवादीचा निकाल ? आमदार-खासदारांची संख्या कुणाकडे अधिक; आयोगाच्या सुनावणीत काय घडलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com