Asim Sarode : सनद रद्द होण्यामागे ठाकरेंच्या वकिलाला राजकारणाचा वास : क्रॉनॉलॉजी सांगत पुढच्या लढाईसाठी थोपटले दंड

Politcal News : बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून विधिज्ञ असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली. सनद रद्द झाल्यानंतर असीम सरोदे यांनी प्रसार माध्यमाकडे पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Uddhav Thackeray, Asim Sarode
Uddhav Thackeray, Asim SarodeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सुप्रीम कोर्टात 12 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून विधिज्ञ असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली. सनद रद्द झाल्यानंतर असीम सरोदे यांनी प्रसार माध्यमाकडे पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

12 ऑगस्ट 2025 रोजी ऑर्डर काढली. ती ऑर्डर मला आज मिळाली तेव्हा निर्णय झाला तर मग आज का दिली? या निर्णयाच्या विरोधात मी बार कौन्सिल इंडियामध्ये अपील करणार असून या निर्णयावर स्टे मागणार असल्याचे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पत्रकार परिषद घेत असीम सरोदे यांनी भूमिका मांडली.12 ऑगस्ट 2025 रोजी ऑर्डर काढली. ऑर्डर मला आज मिळाली तेव्हा निर्णय झाला तर मग आज का दिली? या निर्णयाच्या विरोधात मी बार कौन्सिल इंडियामध्ये अपील करणार आहे. या निर्णयावर स्टे मागणार आहे. 12 ऑगस्टनंतर मी सातत्याने बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या कार्यालयात निर्णयाबाबत विचारले होते तेव्हा सांगण्यात आले नाही. विचारले तर तेव्हा मला का नाही सांगितले ? असा सवाल सरोदे यांनी केला.

Uddhav Thackeray, Asim Sarode
Pune BJP : फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून मी सुप्रीम कोर्टात केस लढवत आहे, सुप्रीम कोर्टात 12 नोव्हेंबरला केस आहे, मग मुद्दाम केले का असा सवाल सरोदे यांनी उपस्थितीत केला आहे. दरम्यान, बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून असीम सरोदे यांची सनद रद्द होताच उद्धव ठाकरे, अनिल परब, राजू शेट्टी यांनी फोनवरुन संपर्क साधला, असल्याचे सरोदे यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray, Asim Sarode
BJP Politics : आशिष शेलारांनी विरोधकांचा की भाजपचाच पर्दाफाश केला? रणनीती उलटणार...

माझ्या विरोधात असा निर्णय होईल असे कधीच वाटले नव्हते. या निर्णयामुळे मला खूप वाईट वाटले. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून हा निर्णय देण्यात आला. माझ्या विरोधात न वकिली करणाऱ्या राजेश दाभोलकरने तक्रार केली आहे. राजेश सुरेश दाभोलकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असेही यावेळी सरोदे म्हणाले.

Uddhav Thackeray, Asim Sarode
Shivsena Vs BJP Politics: एकनाथ शिंदे पक्षाने केली भाजपची गोची; यादीत शोधली २.९८ लाख संशयास्पद मतदार!

गेल्या 25 वर्षांपासून अन्यायग्रस्त नागरिकांना मी मदत करतो, लोकांसाठी मी विविध विषयात काम केले आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केले आहे, असे असीम सरोदे म्हणाले.

Uddhav Thackeray, Asim Sarode
Shiv Sena UBT news : पक्ष-चिन्हाच्या निकालाआधीच ठाकरेंना जोरदार झटका; कोर्टात लढणाऱ्या वकिलाची सनद रद्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com