Pooja Khedkar Residence Theft : पूजा खेडकरच्या कुटुंबीयांना नेपाळी नोकरांनीच लुटलं! चित्रपटाला लाजवील असा घटनाक्रम

Pune Police Pooja Khedkar Residence Theft : निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्या आई वडिलांना घरातील नोकराने बेशुद्ध करत ही चोरी केली.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बनावट कागदपत्रांच्या आधारे आयएएस झाल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांना नोकरांनीच लुटलं असल्याचे प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून चित्रपटाला लाजवेल असा घटनाक्रम लुटीचा घटनाक्रम घडल्याचे सांगितले जात आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील तातडीने गुन्हा दाखल करण्यास मात्र खेडकर कुटुंबाने नाकार दिला आहे. त्यामुळे या घटनेमागचं गूढ आणखीन वाढला आहे.

दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करुन तर पूजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना पूजा खेडकर यांनी फोन करून सांगितले. खेडकरांच्या घरातील अजब चोरीचा पुणे पोलीसांकडून तपास करण्यात येत आहे.

आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. पुजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी रविवारी रात्री चोरी झाल्याची माहिती फोन करून चतुःश्रृंगी पोलिसांना स्वतः पूजा खेडकर यांनी दिली आहे.

पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा मोठा बंगला आहे. या बंगल्यात खेडकर कुटुंबासह अनेक नोकर राहतात. काही दिवसांपूर्वी एक नोकर नव्याने रुजू झाला होता. आठ दिवसांपूर्वी रुजू झालेला हा नोकर नेपाळहून आला असल्याचे सांगितले जात आहे.

त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि आपल्याला बांधून ठेवले असा दावा पूजा खेडकर यांनी केला आहे. त्यानंतर तो नोकर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला असे पुजा खेडकर यांचे म्हणणे आहे.

Pooja Khedkar
Congress Corporator Join BJP : सत्तेची साझेदारी! महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं चाललंय काय? काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन...

बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पुजा यांनी दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले आणि नंतर पोलीसांना फोन केला. माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलीसांचे पथक खेडकर यांच्या घरी पोहचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. पोलीसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांमध्ये तक्रार नाही

पुजा खेडकर यांनी स्वतः दुसऱ्या मोबाईलवरून फोन करून हा प्रकार पोलिसांना कळवला. मात्र, त्यांनी अद्याप पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केलेली नाही. तसेच, आपली मानसिक स्थिती स्थिर झाल्यानंतरच तक्रार दाखल करेन, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. मोबाईल व्यतिरिक्त घरातील इतर कोणत्या वस्तू चोरीला गेल्या याची माहितीही त्यांनी पोलिसांना अजून दिलेली नाही.

Pooja Khedkar
Nashik Crime : संरक्षण कुणाचं? अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळांच्या मतदारसंघातच सापडला प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com