Porsche Hit And Run Case : 'माझा बाप बिल्डर असता तर ', 'माझी आवडती कार', यावर निबंध स्पर्धेचे आयोजन !

Pune Porsche Accident : या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. सध्या या स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या ग्रुपवर ही पोस्ट चांगलीच फिरत असल्याचे पहायला मिळत आहे.
Porsche Accident essay competitio
Porsche Accident essay competitionSarkarnama

Pune Porsche Crash News : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवित दोन जणांना उडविले. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर येवरडा पोलिसांनी या बिल्डर पुत्राला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली. या अल्पवयीन आरोपीला बर्गर, पिझ्झा खाण्यासाठी दिल्याचा आरोप होत आहे.

या अपघाताची माहिती देखील पोलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना न देत लपवून ठेवली. तसेच या आरोपीला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याच्या माहितीमध्ये तथ्य आढळल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस (Police) स्टेशनमधील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जोरदार चर्चा असताना राज्यातील नेते यावर फारसे बोलण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मात्र हे प्रकरणा जोरदार लावून धरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Porsche Accident essay competitio
Pune Hit and Run Case : फडणवीसांनी हात पाय बांधून दादांना पळायला लावलं, धंगेकरांची अजित पवारांवर जोरदार टीका !

या अपघाताच्या प्रकरणानंतर पुणे शहर युवक काँग्रेसने चक्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या विषयांनी मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम क्रमांकाला 11 हजार 111 रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी 17 वर्षे 8 महिने ते 58 वर्षे वयोगटाचे नागरिक भाग घेऊ शकणार आहेत. माझा बाप बिल्डर असता तर?, माझी आवडती कार ( पोर्श ,फरारी,मर्सिडीज,),अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?,दारूचे दुष्परिणाम , मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर? असे विषय या निबंध स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ही निबंध स्पर्धा होणार आहे.

शहर युवक काँग्रेसच्या (Congress) वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या विजेत्यांना कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. सध्या या स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या ग्रुपवर ही पोस्ट चांगलीच फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. या स्पर्धेला आता पुणेकर किती प्रतिसाद देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Porsche Accident essay competitio
Pune Hit and Run Case : मोठी बातमी..! 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक, कारण...

पोर्श कार भरधाव वेगाने चालवून दोन जणांचा बळी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी या 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत बाल न्याय मंडळासमोर हजर केले होते. त्यावेळी सुरूवातीला त्यााल जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या सर्व गोष्टींवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाल्यानंतर याचा फेरविचार करून जामीन रद्द करण्यात आला. त्यानंतर या मुलाची रवानगी 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांची चौकशी करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या वतीने केला जात आहे.

Porsche Accident essay competitio
Sanjay Shirsat V/S Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या धंगेकरांनी स्टंटबाजी थांबवावी, शिवसेनेच्या शिरसाट यांनी फटकारले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com