पुणेकरांना दिवाळी गिफ्ट; रिक्षा भाडेवाढीबाबत परिवहन विभागाचा मोठा निर्णय

पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 81 पैसे वाढ करण्यात आली होती.
Rickshaw Pune
Rickshaw Pune
Published on
Updated on

पुणे : इंधनाच्या (Fuel Rate) सततच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडालेला असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) पुणेकरांना दिवाळी (Diwali) गिफ्ट दिले आहे. मागील बैठकीत घेण्यात आलेला रिक्षा भाडेवाढीचा निर्णय लांबवणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 8 नोव्हेंबरपासून होणारी भाडेवाढ टळली आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती) यांची संयुक्त बैठक ता. 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. या बैठकीत खटुआ समितीच्या शिफारशींनुसार रिक्षा भाडेसुधारणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार येत्या 8 नोव्हेंबरापासून भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 81 पैसे वाढ करण्यात आली होती.

Rickshaw Pune
मोदी है तो मुमकिन है...अन् 'तो' फोटो व्हायरल होताच WHO ने फटकारलं!

पुणेकरांना नवीन भाडे अनुक्रमे 20 व 13 रुपये असे पडणार होते. पण या निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या चार दिवस आधीच आरटीओने निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर लगेचच ही भाडेवाढ प्रस्तावित होती. आधीच इंधनाचे दर सतत वाढत असल्याने नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडणार होता. त्यातच रिक्षा भाडेवाढ झाली असती तर त्याचा आणखी फटका बसला असता.

Rickshaw Pune
शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदारांचं जंगी स्वागत

प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाडेदरवाढीचा पुनर्विचार व्हावा, यासाठी विविध रिक्षा संघटनांनी निवेदने सादर केलेली आहेत. त्यामुळे भाडेवाढीचा पुनर्विचार करण्याची बाब प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात येत आहे. तोपर्यंत सध्याचे भाडेदर कायम राहतील, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

पुणे आरटीओ कार्यक्षेत्रांतर्गत सध्याचे रिक्षा भाडेदर

पहिल्या दीड किमीसाठी किमान भाडे - 18 रुपये

त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे - 12.19 रुपये

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com