Devendra Fadnavis warning : देवेंद्र फडणवीसांचा शेवटचा इशारा पण वादग्रस्त मंत्री सुधारणार का ?

Controversial minister News : फडणवीस यांनी घेतलेल्या या वर्गामुळे मंत्र्यांनी येत्या काळात वादग्रस्त बोलणे टाळले, तरी खूप काही परिणाम झाल्याचे दिसेल.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सध्या तीन पक्षाचे मिळून महायुतीचे सरकार असल्याने सर्वच पक्षांच्या मंत्र्यांना सांभाळताना सीएम फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे विरोधकाकडून टीका केली जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीवेळी त्यांची कानउघाडणी केली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीएम देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीवेळी वादग्रस्त मंत्र्यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे हे मंत्री यामधून काय बोध घेतील अन स्वतःमध्ये सुधारणा करतील? अशी किमान अपेक्षा आहे. फडणवीस यांनी घेतलेल्या या वर्गामुळे मंत्र्यांनी येत्या काळात वादग्रस्त बोलणे टाळले, तरी खूप काही परिणाम झाल्याचे दिसेल.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैठकीवेळी वादग्रस्त मंत्र्यांची कानउघाडणी केली. काही मंत्री बेताल बोलतात आणि वागतात त्यानंतर आपल्या नेत्याच्या मागे लपून आपला बचाव करून घेतात. येत्या काळात असा प्रकार चालणार नाही, अशा शब्दातच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समक्षच सुनावले. मित्र पक्षांकडून मनमानी कारभार होऊनही मी पाहत बसणार नाही, असे त्यांनी सूचित केले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Solapur Shivsena : सोलापूरच्या शिवसेनेत मोठी घडामोड; तानाजी सावंतांच्या बंधूंचा संपर्कप्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा

राज्यातील सरकार महायुतीचे असले तरी सरकारचा प्रमुख म्हणून अंतिम जबाबदारी जशी मुख्यमंत्र्याची असते तशी तीन पक्षाचे मिळून सरकार असले तरी सोबतचे दोन पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना घेऊन चालताना सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा सरकारचे प्रमुख म्हणून फडणवीस यांनाच कठोर होणे अपेक्षित आहे. त्यामुळेच त्यांनी कठोर होत पावले उचलली आहेत.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
ED Raid : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण; ED ची ऐतिहासिक रेड, पहिल्यांदाच गाठले अंदमान

राज्यात गेल्या तीन दशकाहुन अधिक काळ युती आणि आघाडीचे सरकार आहे. एका पक्षाचे सरकार असेल तर त्या एकाच्या सांगण्यावरून चालते पण तीन पक्षाचे मिळून सरकार असेल तर तीन पक्षांना संभाळताना तारेवरची कसरत कारवाई लागते. दोन-तीन पक्ष मिळून असलेल्या सरकारचे फायदे जसे आहेत तसे तोटे देखील आहेत. महाराष्ट्राने ते इतके वर्ष अनुभवलेले आहेत.

तीन पक्ष सत्तेत असताना कोणी एका पक्षाच्या व एका नेत्याची संपूर्ण नियंत्रण नसणे हे सर्वात मोठे डोकेदुखी आहे. मात्र, स्वतःच्या पक्षाचे 137 आमदार असल्याने फडणवीस यांची मांड पक्की आहे. त्यामुळे मित्रपक्ष काही गडबड करण्याची शक्यता नाही. त्यामुळे अशावेळी सर्वासाठी एकाच नियम लावत सरकारमधील दोष दूर करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्याचमुळे फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Malegaon blast verdict : मोठी बातमी ! भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंहांसह सर्वच आरोपी निर्दोष : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA तपासावर प्रश्नचिन्ह

राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामाची गुणवत्ता व कामाची पद्धत पाहिली तर पारदर्शक कारभार ध्येय धोरणाबाबतचा दृष्टिकोन महायुतीने (Mahayuti) बदलला नाही. मात्र, गेल्या काही दिवसापासून वादग्रस्त विधाने केली जात असल्याने राज्य सरकारची प्रतिमा मालिन होत आहे. त्याशिवाय काही मंत्र्यांकडून आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Malegaon Blast Verdict : NIA चे सगळे दावे खोडून काढले; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाची कोर्टाकडून चिरफाड, 'या' कारणाने साध्वी, पुरोहित निर्दोष सुटले!

पावसाळी अधिवेशनकाळात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट पैशाची बॅग घेऊन बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्यांना केलीली मारहाण तर योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेला डान्सबारचा परवाना तर संजय राठोड यांचे भ्रष्टचाराचे प्रकरण यामुळे शिवसेनेचे नेते अडचणीत आले आहेत. तर विधीमंडळाच्या आवारात हाणामारी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे हे दोघेही वादात अडकले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात बसून रमी खेळत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
BJP AIADMK Alliance Tamil Nadu : मोठी बातमी! तामिळनाडूत आता BJP-AIADMK युती ; अमित शहांनी केली घोषणा अन् म्हणाले...

त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या या सर्व कारणामुळे अडचणीत भर पडली होती. तर दुसरीकडे विरोधाकडून वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढवला जात होता. त्यामुळे वातावरण तापले होते. त्यामुळेच सीएम फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांना सुनावले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या कानउघडणीचा परिणाम येत्या काळात कधीपर्यंत असणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Solapur Shivsena : सोलापूरच्या शिवसेनेत मोठी घडामोड; तानाजी सावंतांच्या बंधूंचा संपर्कप्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com