Pune News: काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत गटतटाचे राजकारण चांगलेच सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे. प्रदेश काँग्रेसने प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असून हेवेदाव्यांचे राजकारण सध्या सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दरम्यान त्यांनी आपल्या सोबत घडलेला एक किस्सा सांगितला.
प्रशांत जगताप म्हणाले, मी आयुष्यात कधीच कुणाला घाबरलो नाही. सत्तेतला पक्ष असो वा कुठला मोठा नेता असो वा मुख्यमंत्री यापैकी कोणालाही मी घाबरलो नाही आणि कोणाच्या धमक्यांना भीक देखील घातली नाही.
याबाबतचा एक किस्सा सांगतो, काँग्रेस शहराध्यक्ष पद मिळण्याच्या अगोदर काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबाच्या विरोधात पुण्यात आम्ही आंदोलन केलं होतं. महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत बागेश्वर बाबा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
याबाबत लाल महाल येथे झालेल्या आंदोलनादरम्यान आम्ही बागेश्वर बाबाच्या फोटोला चपलांचा हार घातला. आणि आंदोलनाच्या शेवटी पोस्टरला काळे देखील फासले होते. याबाबतची पोस्ट मी सोशल मीडियावर शेअर केली होती. यानंतर मला धमकीचे फोन आणि मॅसेज येऊ लागले. या मेसेजेसमध्ये "प्रशांत जगताप हम तुमको छोडेंगे नही गोली मार देंगे, आपके वहा आके मार देंगे, आपकी छाती मे चार चार गोलिया डाल देंगे" अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच काहींनी फोन कॉल करून बघून घेण्याच्या धमक्या दिल्या हा सगळा घटनाक्रम मे महिन्यात घडला.
बागेश्वर बाबाच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या तोंडाला काळं फसण्याची पोस्ट देशभर पाहिली गेली. त्याला जवळपास ७८ हजार लाईक आणि ५७ शेअर होते. यात खबरदारीचा उपाय म्हणून वानवडी पोलीस चौकी मध्ये तक्रार देखील दिली होती. तरीदेखील कोणत्याही प्रकारचं पोलीस संरक्षण मी मागितला नाही. आणि शहरात चार पोरं घेऊन फिरलो नाही. असा किस्सा प्रशांत जगताप यांनी सांगितला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.