Pune rickshaw license rule : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये; शिवतारेंचे फडणवीस, शिंदे यांना पत्र

Maharashtra politics : शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले आहे.
EKnath shinde, Devendra Fadnavis
EKnath shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शहरात रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आता अर्जदाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात कडक पाऊले उचलली असून, ज्यांना मराठी बोलता आणि वाचता येते, त्यांनाच नवीन परवाने दिले जाणार आहेत. राजकीय वर्तुळात उलट प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. काहीजण या निर्णयाच्या विरोधात उतरल्यातून काही जणांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी देखील या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना ज्या चालकांना मराठी येत नाही. त्यांना मराठी शिकवण्याची भूमिका घेणार हे स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयाला होणारा वाढता विरोध पाहता हा निर्णय मागे घेतले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Satara Shivsena Sabha: जयकुमार गोरेंनी शिवसेनेच्या नाकावर टिच्चून झेडपीची सत्ता हिरावली, त्याच साताऱ्यातून शिंदेंनी भाजपला ललकारलं; म्हणाले...

या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित असलेल्या मराठी भाषेच्या प्रश्नावर अलीकडे मोठया प्रमाणावर चर्चा होत आहे. विशेषतः रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य व स्वागतार्ह आहे. शिवसेनेची (Shivsena) स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्या विचारांचा वारसा पुढे नेणे हे आजच्या नेतृत्वाचे कर्तव्य आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय नागरिक उपजीविकेसाठी येतात, हे स्वागतार्ह आहे. मात्र, येथे राहून व्यवसाय करताना मराठी भाषा आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय हा केवळ भाषेचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अलीकडील घडामोडींमध्ये काही ठिकाणी या निर्णयाला विरोध होत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत सरकारने ठाम भूमिका घेऊन हा निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये, अशी विनंती वजा मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Satara Shivsena Sabha: जयकुमार गोरेंनी शिवसेनेच्या नाकावर टिच्चून झेडपीची सत्ता हिरावली, त्याच साताऱ्यातून शिंदेंनी भाजपला ललकारलं; म्हणाले...

महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवर स्पष्ट व ठोस भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय राजकारणासोबतच प्रांतीय अस्मिता जपणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आपण या विषयावर स्पष्ट भूमिका घेऊन मराठी माणसाच्या भावना जपाव्यात असे देखील या पत्रामध्ये शिवतारे म्हणाले आहेत.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Sangli Politics: सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महायुतीतल्या आणखी एका घटक पक्षाचे सदस्य फुटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com