Pune fraud : पुण्यात आतापर्यंतचा मोठा फ्रॉड! 3 महिने, 26 सिमकार्ड्स अन् 22 कोटी लंपास; तपासात समोर आलेलं सत्य वाचून फुटेल घाम!

Cyber crime fraud Pune news : पुण्यात अवघ्या ३ महिन्यांत २६ सिमकार्ड्स वापरून २२ कोटींची मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आली. पोलीस तपासातून समोर आलेले धक्कादायक सत्य वाचा.
Cyber fraud
Cyber fraud Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड गुन्हे घडताना पाहायला मिळत आहेत. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगार आपलं लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. असंच पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला गंडा घालून 22 कोटींची फसवणूक झाली असल्याचा समोर आले आहे.

ही आतापर्यंत घडलेली पुणे परिसरातील सर्वात मोठी ऑनलाइन फ्रॉडची घटना असल्याचं पोलिसांनी देखील मान्य केला आहे. ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी तीन लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Cyber fraud
TET exam result news : TET परीक्षेचा धक्कादायक निकाल; विद्यार्थ्यांना शिकवणारे 'मास्तर' नापास?

या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस तपास करत आहेत. तक्रारदार हे मूळचे गुरुग्राम(हरियाणा) येथील असून सध्या मगरपट्टा सिटी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा हडपसर औद्योगिक वसाहतीत छोटा कारखाना होता.

मात्र करोना काळात आर्थिक अडचणीमुळे त्यांनी कारखाना विक्री केला. या व्यवहारातून मिळालेली मोठी रक्कम आणि इतर मालमत्ता विक्रीतून मिळालेले पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. त्यावरती सायबर गुन्हेगारांनी डोळा ठेवून त्यांची लुबाडणूक केली असल्याचे समोर आले आहे.

या फसवणुकीसाठी चोरट्यांनी २६ मोबाइलचा वापर केला असून अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तक्रारदारांनी सात बँकांमधील १५० वेगवेगळ्या खात्यांत पैसे पाठवले असल्याचा समोर आला आहे.

ज्या खात्यांमध्ये हे पैसे वळवण्यात आले की खाती मुख्यतः नोएडा, कोलकाता, बंगळुरू आदी शहरांतील 'म्यूल अकाउंट्स' (भाड्याने वापरली जाणारी खाती) असल्याचे आढळले आहे.फसवणुकीसाठी चोरट्यांनी २६ मोबाइल क्रमांक,एक इंटरनेट-आधारित फोन नंबर, तीन वेब लिंक आणि बनावट 'शेअर ट्रेडिंग अॅप' वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.

Cyber fraud
Shiv Sena BJP alliance : महापालिकेत स्वबळावर सत्ता, तरी भाजपने झेडपीसाठी शिवसेनेसोबत युती का केली? हे आहे कारण..

तक्रारदारांनी म्हणजे ज्यांची फसवणूक झाली त्यांनी सहज बोलताना मुलाला ऑनलाइन 'शेअर ट्रेडिंग' मध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. यानंतर मुलाला संशय आला. त्यानंतर कुटुंबियांनी पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल पोलिस केली. अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com