Pune Politics : सुप्रिया सुळे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्याला पक्षप्रवेश देण्यावरून भाजपमधील खासदार-आमदार भिडले...

Pune BJP clash : पुणे भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्ती नेत्याच्या संभाव्य प्रवेशावरून मोहोळ व तापकीर भिडले. या मुद्द्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी व कलह वाढल्याचे दिसते.
Murlidhar Mohol ,Bhimrao Tapkir
Murlidhar Mohol ,Bhimrao TapkirSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज पुण्यामध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न होत आहे. या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये वेटिंग वरती असलेल्या 21 नेत्यांच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिला जाणार असून त्याला विरोध देखील होत आहे.

अशातच आज कोअर कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी नगरसेवक असलेल्या सचिन दोडके यांच्या प्रवेशावरून खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर हे भिडले असल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असलेले सचिन दोडके भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत दोडके यांचे पुण्यातील वारजे भागात फ्लेक्स देखील लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.

सचिन दोडके यांनी 2 वेळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खडकवासला विधानसभा विधानसभा निवडणूक लढवली आहे. या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी त्यांचा पराभव केला आहे.मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये अवघ्या दोन ते अडीच हजार मतांनी दोडके यांचा पराभव झाला होता.

Murlidhar Mohol ,Bhimrao Tapkir
Pune Politics : पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का : सचिन अहिर, वसंत मोरेंनी बड्या नेत्यांना आणले ठाकरेंच्या शिवसेनेत

आता सचिन दोडके यांच्यामुळे भाजप मध्ये अंतर्गत कलह निर्माण झालाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोडकेंमुळे पुण्यातील भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत वाद झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रवेशाला भीमराव तापकीर यांनी कडाडून विरोध केला असल्याचं समोर आला आहे.

Murlidhar Mohol ,Bhimrao Tapkir
Jayant Patil On  Sharad Pawar : 'शरद पवारांकडून कोणीही वदवून घेऊ शकत नाही', जयंत पाटलांनी प्रशांत जगतापांच्या 'त्या' दाव्यातील हवाच काढली

पक्षप्रवेशामुळे अनेक भाजपचे (BJP) पदाधिकारी नाराज असल्याचे सांगितलं जात होतं. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याचं समोर आला आहे. त्यामुळे आगामी काळात या पक्षप्रवेशांबाबत काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com