Pune Municipal Election : भाजपनं फिरवली चक्रं; राष्ट्रवादी अन् सेनेला अंधारात ठेवून टाकणार मोठा डाव...

Pune Municipal Election : पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी भाजपकडून उमेदवार निवड प्रक्रिया गतीमान झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून तीन टप्प्यांत होणार आहेत.
Union Minister Murlidhar Mohol leading BJP’s Pune municipal election candidate selection meeting, reviewing plans for interviews and shortlisting process across 14 municipalities and 3 councils.
Union Minister Murlidhar Mohol leading BJP’s Pune municipal election candidate selection meeting, reviewing plans for interviews and shortlisting process across 14 municipalities and 3 councils.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने आता उमेदवार निश्चितीच्या कार्यक्रमाला भाजपकडून सुरुवात करण्यात आली आहे. याच दृष्टिकोनातून आता निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम भाजपकडून हाती घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असून शुक्रवारी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषगद निवडणुकी संदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली.

पुणे जिल्ह्यामध्ये 14 नगरपालिका आणि तीन नगरपरिषदा येतात या निवडणुकीची रणनीती ठरवण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक आमदार, माजी आमदार, वरिष्ठ नेते आणि पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाध्यक्ष समवेत ही बैठक घेण्यात आली.

Union Minister Murlidhar Mohol leading BJP’s Pune municipal election candidate selection meeting, reviewing plans for interviews and shortlisting process across 14 municipalities and 3 councils.
Pune BJP ची महापालिकेसाठीची छुपी Strategy? Dhangekar यांचा Shinde यांना फायदा? Corporation Election

त्यानंतर आता उद्या सोमवारी या 14 नगरपालिका आणि तीन नगर नगरपरिषदांची निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून इच्छुक असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच भाजपने इच्छुकांच्या अर्ज मागवले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Union Minister Murlidhar Mohol leading BJP’s Pune municipal election candidate selection meeting, reviewing plans for interviews and shortlisting process across 14 municipalities and 3 councils.
PMC Election 2025: अजितदादांवर मुरलीअण्णा ठरले भारी! दोनवेळा सांगून जे भाजपला पाहिजे तेच केले

आता याच इच्छुकांच्या मुलाखती मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत. या मुलाखतीला पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाध्यक्ष यांच्यासह आमदार राहुल कुल, महेश लांडगे, माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत.

Union Minister Murlidhar Mohol leading BJP’s Pune municipal election candidate selection meeting, reviewing plans for interviews and shortlisting process across 14 municipalities and 3 councils.
Pune BJP : पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी भाजपमध्ये 1000 इच्छुक, उमेदवारी निश्चितीसाठी अशी लागणार कात्री, 50 टक्के दिग्गजांचे पत्ते कट होणार

या मुलाखतीचे ठिकाण हे पुणे उत्तरसाठी हडपसर परिसरात तर पुणे दक्षिण साठी बाणेर परिसरात नियोजित करण्यात आला आहे. या मुलाखतींच्याच आधारे प्राथमिक टप्प्यांमध्ये उमेदवारांची छाननी करण्यात येणार आहे. पहिल्याच मुलाखतींच्या टप्प्यात शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार पुढील टप्प्यातील उमेदवारीच्या रेसमध्ये राहणार आहेत. भाजप कडून तीन टप्प्यांमध्ये उमेदवारी निश्चिती करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक होण्याची इच्छा मनाची बाळगून असलेल्या भाजप कार्यकर्त्यांसाठी उद्यापासून खरी परीक्षा सुरू होणार आहे.

Union Minister Murlidhar Mohol leading BJP’s Pune municipal election candidate selection meeting, reviewing plans for interviews and shortlisting process across 14 municipalities and 3 councils.
NCP Pune: राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष कोण? दोघांमध्ये चुरस,अजितदादाचं धक्कातंत्र?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com