Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा, नरेंद्र मोदींना भेटणार; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा?

Sunetra Pawar Delhi Visit Amit Shah PM Modi : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे.
Sunetra Pawar during her Delhi visit where she is expected to meet Amit Shah and Prime Minister Narendra Modi.
Sunetra Pawar during her Delhi visit where she is expected to meet Amit Shah and Prime Minister Narendra Modi.sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार संभाळला. त्यानंतर त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती आहे. त्या दिल्लीत दाखल झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडील अर्थ खाते वगळता सर्व खाती त्यांना देण्यात आली आहेत. तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देखील त्यांना देण्यात आले आहे.

अजित पवारांच्या निधनाने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागला आहे. विलीनीकरणाचा निर्णय झाला होता. त्याची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांचे अपघाती निधन झाले, असे दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपची भूमिका देखील महत्त्वपूर्ण राहणार आहे.

Sunetra Pawar during her Delhi visit where she is expected to meet Amit Shah and Prime Minister Narendra Modi.
PMC Standing Committee : स्थायी समितीसाठी मजबूत फिल्डिंग;पुणे भाजप खेळणार मोठा डाव, नगरसेवकांचे बैठकीकडे लक्ष

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार या दिल्ली गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्यी राष्ट्रवादी ही एनडीएसोबत आहे. त्यामुळे विलीनीकरणाबाबत भाजपला देखील विश्वासत घेणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

रोहित पवारही दिल्लीत

अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रोहित पवार हे देखील दिल्ली दौऱ्यावर असून ते महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते. दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sunetra Pawar during her Delhi visit where she is expected to meet Amit Shah and Prime Minister Narendra Modi.
PMC News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवकांचं आवडत्या कर्मचाऱ्यासाठी 'लॉबिंग', प्रशासनाची तारेवरची कसरत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com