Pune By-Election : कसबा-चिंचवडसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची फौज जाहीर!

Pune By-Election : स्टार प्रचारकांमध्ये अमोल कोल्हे यांचा ही समावेश!
Pune By-Election : Sharad Pawar
Pune By-Election : Sharad Pawar Sarkarnama

Pune By-Election : पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे येथील मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.

Pune By-Election : Sharad Pawar
Sudhir Mungantiwar At Baramati : अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ बैठकीतच सांगितले अन तातडीने बारामती दौरा ठरविला : मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारकांमध्ये एकूण २१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेतेअजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार वंदना चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख विद्या चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्षा जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके, पक्षाचे पदाधिकारी शेख सुभान अली हे स्टार प्रचारक आहेत.

Pune By-Election : Sharad Pawar
Chinchwad By-Election : "माझ्या आमदारकीचा निर्णय अजितदादा नाही, तर चिंचवडची जनताच घेईल.."

यात विशेष म्हणजे स्टार प्रचारक यादीमध्ये अमोल कोल्हे यांचा ही समावेश केला गेला आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले होते. यामुळे कोल्हे हे पक्षावर नाराज असल्याबाबत चर्चा घडून येत होती.मागील काही दिवसात कोल्हें पक्षावर नाराज असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. मात्र आता त्यांचा पक्षाच्या स्टार प्रचारकांध्ये समावेश झाल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याचे बोलेले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com